५०० शक्तिशाली संगणकांमध्ये भारताच्या परमसिद्धीची भरारी

सी-डॅक येथे राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत स्थापन केलेल्या उच्च कामगिरी कम्प्यूटिंग-कृत्रिम बुद्धिमत्ता (एचपीसी-एआय) क्रमवारीत हे स्थान पटकावले आहे.

param

विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताकडून उल्लेखनीय कामगिरी केली जात असताना आता भारताचा सुपर कॉम्प्युटर परमसिद्धीने जागतिक संगणक क्षेत्रात ६३ वे स्थान पटकावले आहे. सी-डॅक येथे राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत स्थापन केलेल्या उच्च कामगिरी कम्प्यूटिंग-कृत्रिम बुद्धिमत्ता (एचपीसी-एआय) क्रमवारीत हे स्थान पटकावले आहे. जगातील सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालीमधील अव्वल ५०० संगणकांची यादी १६ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली.

परमसिद्धी सुपर कॉम्प्यूटर एनव्हीआयडीए डीजीएक्स सुपर पीओडी संदर्भ आर्किटेक्चर नेटवर्किंग व सी- डॅकच्या स्वदेशी विकसित एचपीसी-एआय इंजिन, सॉफ्टवेअर फ्रेमवर्क आणि क्लाऊड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. सखोल शिक्षण, व्हिज्युअल संगणन, आभासी वास्तविकता, प्रवेगक संगणन तसेच ग्राफिक्स व्हर्च्युअलायझेशन मध्ये मदत करेल. एआय यंत्रणा प्रगत साहित्य, संगणकीय रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र यासारख्या क्षेत्रात अ‍ॅप्लिकेशनच्या विकासामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. औषधाची रचना आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रणालीसाठी एका व्यासपीठांतर्गत अनेक पॅकेजेस विकसित केली जात आहेत.

मुंबई, दिल्ली, चेन्नई, पटना आणि गुवाहाटी सारख्या पूरग्रस्त मेट्रो शहरांसाठी पूर पूर्वानुमान पॅकेजेस विकसित करण्यात येत आहेत. जलद सिमुलेशन, मेडिकल इमेजिंग, जीनोम सीक्वेन्सिंग आणि पूर्वानुमान या माध्यमातून कोविड -१९ विरूद्धच्या लढाईत संशोधन आणि विकासाला यामुळे गती प्राप्त होईल आणि भारतीय जनतेसाठी आणि विशेषत: स्टार्ट-अप्स आणि एमएसएमईसाठी हे वरदान आहे.

भारतासाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. जगातील सर्वात मोठ्या सुपर कॉम्पुटर पायाभूत सुविधांपैकी एक भारतामध्ये आहे. परम सिद्धी-एआयला मिळालेल्या क्रमवारीमुळे हे सिद्ध झाले आहे.
– प्रा. आशुतोष शर्मा, सचिव, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग