इस्रो मिळवणार चंद्रावरील आण्विक इंधन

हीलियम-३ ची किंमत प्रतिटन ५ अब्ज डॉलर्स आहे. चंद्रावर २ लाख ५० हजार टन हीलियम-३ उपलब्ध आहे, मोहीमेस यश आल्यास भारताला अब्जावधी डॉलर्सचा फायदा होण्याची शक्यता आहे.

New Delhi
moon

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चंद्रावरील अशा भागावर जाण्याची तयारी करत आहे ज्या भागावर कधीही कोणता देश पोहचू शकला नाही. याठिकाणी पोहचल्यानंतर तेथे असलेल्या आण्विक इंधनाच्या स्त्रोताचा शोध घेण्यात येईल. या उपक्रमातून इस्रोला ट्रिलियन डॉलर्सचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्राच्या दक्षिणेकडील भागातील ही शोधमोहिम ऑक्टोबरमध्ये सुरु होणार असून या अंतर्गत चंद्रावरील पाणी आणि हीलियम-३ चा शोध घेण्यात येणार आहे. पृथ्वीवरील इंधनाचे साठे मर्यादित आहेत. या मोहिमेला यश आल्यास मिळालेले इंधन २५० वर्षांपार्यंत पृथ्वीच्या इंधनाची गरज भागवू शकणार आहे. युएस, चीन, भारत, जपान आणि रशिया हे देश वैज्ञानिक, व्यापारी आणि लष्करी लाभासाठी चंद्र आणि मंगळग्रहावर शोधकार्य मोहिमेच्या शर्यतीत आहेत. यामध्ये भारताने पहिल्यांदाच अशा मोहिमेला जाण्याची तयारी दाखवली आहे. चंद्रावरील काळ्या भागात हीलियम-३ चे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हीलियम-३ ची किंमत प्रतिटन ५ अब्ज डॉलर्स आहे. चंद्रावर २ लाख ५० हजार टन हीलियम-३ उपलब्ध आहे. हे मिळवण्यास भारताला यश आल्यास भारताला अब्जावधी डॉलर्सचा फायदा होणार आहे.

अंतराळ स्थानक आणि उपग्रह लाँच करणाऱ्या इस्रोने एक पाऊल पुढे जाऊन ‘रोव्हर लँडिंग’ ही संकल्पना मांडली आहे. सरकारने अद्याप या उपक्रमाची मर्यादा निश्चित केली नसली तरीही ऑक्टोबरमध्ये या उपक्रमाला सुरुवात होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर आणि रोव्हर (उपग्रह) सोडण्यास आतापर्यंत फक्त चीनला यश मिळाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चंद्रावर जाऊन परत येणाऱ्या अंतराळ उपक्रमासाठी नासाला १९ अब्ज डॉलर्सची तरतूद वार्षीक अहवालात केली आहे. चंद्रावर जाणारी ही भारताची पहिली मोहीम नसून या पूर्वीही २००८ मध्ये चंद्रयान-१ प्रकल्पाला यश मिळाले.

Chairman ISRO
इस्त्रोचे अध्यक्ष कैलास्वाडिव सिवान

या प्रकल्पाबाबत माहिती देताना इस्रोचे अध्यक्ष कैलास्वाडिव सिवान यांनी सांगितले की, “चंद्र आणि पूर्वी दरम्याने अंतर कमी करण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरु आहे. मला शर्यतीत फक्त भाग घ्यायचा नसून मला आघाडीवर राहायचे आहे. या विशिष्ट कार्यक्रमासाठी आम्ही सज्ज आहोत.”