Birthday Special: इंदिरा गांधींच्या एका निर्णयामुळे देशातील बँकिंग व्यवस्था बदलली

indira gandhi birthday special when indira gandhi these decision changed banking system of india
Birthday Special: इंदिरा गांधींच्या एका निर्णयामुळे देशातील बँकिंग व्यवस्था बदलली

आज देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस आहे. आजपासून १०३ वर्षांपूर्वी १९ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान राहिल्या आहेत. जानेवारी १९६६ पासून मार्च १९७७ पर्यंत आणि पुन्हा जानेवारी १९८० पासून ऑक्टोबर १९८४ पर्यंत इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी आणि आणीबाणी परिस्थितीबद्दल संपूर्ण देशाला माहिती आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला इंदिरा गांधीच्या एका निर्णयाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे संपूर्ण भारताची बँकिग व्यवस्था बदलली.

जवळपास ५१ वर्षांपूर्वी १९ जुलै १९६९ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एका निर्णयामुळे देशातील पूर्ण बँकिंग व्यवस्था बदलली. जेव्हा इंदिरा गांधी यांनी १४ मोठ्या खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते. आजही या निर्णयाचा बँकांवर परिणाम होत आहे.

राष्ट्रीयीकरणाला साध्या भाषेत सरकारीकरण देखील म्हटले जाऊ शकते. एखाद्या बँकेची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते आणि त्या बँकेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते तेव्हा त्याला राष्ट्रीयीकरण म्हटले जाते. तसेच ज्यावेळेस सरकारच्या भांडवलाचा कमीत कमी ५१ टक्के वाटा असतो. त्यावेळेस सरकारला बँकाच्या संस्थांचे मालक समजले जाते.

भारतात सर्व प्रथम राष्ट्रीयीकृत बँक भारतीय स्टेट बँक होती. यानंतर राष्ट्रीयीकरण १९५५मध्ये केले होते. मग त्यानंतर १९५८ साली एसबीआयच्या सहयोगी बँकांचेही राष्ट्रीयीकरण केले. १९६९ साली इंदिरा गांधींनी सर्वात मोठ्या प्रमाणात बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले. एकाच वेळी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले होते.

राष्ट्रीयीकरण केलेल्या ‘या’ १४ बँका…

 1. बँक ऑफ इंडिया
 2. पंजाब नॅशनल बँक
 3. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
 4. इंडियन बँक
 5. बँक ऑफ बड़ौदा
 6. देना बँक
 7. यूको बँक
 8. सिंडिकेट बँक
 9. कॅनरा बँक
 10. इलाहाबाद बँक
 11. यूनाइटेड बँक
 12. यूनियन बँक ऑफ इंडिया
 13. इंडियन ओवरसीज बँक
 14. बँक ऑफ महाराष्ट्र