Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग काय सांगता! मास्क नाही घातला म्हणून चक्क ५० पुश-अप्सची शिक्षा

काय सांगता! मास्क नाही घातला म्हणून चक्क ५० पुश-अप्सची शिक्षा

विनामास्क फिरणाऱ्यांना ५० पुश-अप्स तर व्यवस्थित मास्क न लावलेल्यास १५ पुश-अप्सची शिक्षा देण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोनाने थैमान घातल्यापासून सॅनिटायझर आणि मास्क या वस्तू आपल्या प्रमुख गरजा झाल्या आहेत. कोरोनाचा कहर आता कमी झाला असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे घराबाहेर पडल्या नंतर मास्क लावणे बंधनकारक आहे. मात्र आपल्याकडे बरेच जणांना याचा विसर पडलेला दिसून येतो. बरेच लोक विनामास्क फिरताना दिसतात. मास्क न लावताच फिरणाऱ्यांना थेट पुश अप्स मारण्याची शिक्षा देण्यात येत आहे. काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बाली येथील हे फोटो आहेत. बालीमध्ये येणारे पर्यटक आणि तिथले नागरिक विना मास्क रस्त्यावर फिरताना दिसले की त्यांना तब्बल ५० पुश अप्स मारण्याची शिक्षा देण्यात येत आहे. अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांना चांगलाच इंगा दाखवण्यात आला आहे.

- Advertisement -

बालीत येणारे पर्यटकांचे पुश-अप्स करतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात छोटे छोटे कपड्यातील पर्यटक पुश अप्स मारताना दिसत आहेत. पुश अप्स मारताना होणारी एक्ससाईज आणि होणारी दमछाक असे मजेशीर व्हिडिओ पहायला मिळत आहे. बालीमध्ये कोरोनाच्या काळात सर्व नियमांचे पालन करत होते. त्यामुळे बाली इंडोनेशियामध्ये कोरोनावर लवकर मात करता आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बाली हे शहर पर्यटनासाठी खुले करण्यात आले. तिथे येणारे पर्यटक मात्र तिथल्या नियमांचे पालन न करता विना मास्क फिरताना दिसत आहेत, असे बालीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना ५० पुश-अप्स तर व्यवस्थित मास्क न लावलेल्यास १५ पुश-अप्सची शिक्षा देण्यात येत आहे.

- Advertisement -

बालीमध्ये आलेल्या पर्यटकांकडून विनामास्क फिरत असल्याने आत्तापर्यंत ७० लोकांकडून जवळपास १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यातील ३० जाणांकडे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना ५० पुश-अप्स मारण्याची शिक्षा देण्यात आली.


हेही वाचा – बघा Video: हत्तीने पायाने आणि सोंडेने केला महिलेचा मसाज

- Advertisement -