Video: …आणि मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणीने मारली उडी

मध्य प्रदेशमध्ये एका तरुणीने मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

indore woman jump from mall suicide attempt video viral video
Video: ...आणि मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणीने मारली उडी

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे या काळात मोठ्या संख्येने आत्महत्या देखील होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नेमके काय घडले?

मध्य प्रदेशच्या इंदौर शहरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार; C-12 मॉलमधील ही दृश्य असून या दृश्यामध्ये एक तरुणी तिसऱ्या मजल्यावरुन अचानक खाली उडी मारते. मात्र, सुदैवाने ही तरुणी बचावली आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.

दोन दिवसांपूर्वीच या तरुणीच्या पहिल्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. ज्याचा धक्का तिला बसला होता. ती खूप दुःखात होती. ती आपल्या वडिलांसह फरीदाबादला जायला निघाली होती. एअरपोर्टला जाण्यासाठी ती रवाना झाली. मात्र, ज्यूस पिता पिता ती तिथून गायब होते आणि खाली उडी मारते, अशी माहिती समोर आली आहे.

पहिल्या पतीच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर या तरुणीने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी मॉलमध्ये आत्महत्या करताना दिसली. दरम्यान यामागे नेमके कारण काय आहे ते समजू शकलेले नाही.


हेही वाचा – ‘प्रेमनगरी’ आग्र्यात खळबळ! पत्नीला प्रियकरासह रंगेहात पकडलं; पतीनं चपलेनं थोबडवलं