हाथरसची पुनरावृत्ती; गुजरातमध्ये रेल्वे ट्रॅकवर तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली

. गुजरातमधील सूरत येथे हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेची पुनरावृत्ती

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात रोष असताना हाथरसची गुजरातमध्ये पुन्हा पुनरावृत्ती झाल्याचा प्रकार घडला आहे. गुजरातमधील सूरत येथे हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. येथील रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी जखमी अवस्थेत सापडली असून या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या तरुणीवर रुगणालयात उपचार सुरू असून तिची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

अशी घडला प्रकार

गुजरातमधील सूरतमधील पलसाणामध्ये गंगाधरा येथील गंगापूर रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी बेशुद्धावस्थेत सापडली आहे. ती गंभीररीत्या जखमी झालेली होती. त्यानंतर कुणीतरी एक महिला पडली असल्याची माहिती कंट्रोल रूमला देण्यात आली. त्यानंतर या तरुणीला त्वरित सिव्हील रुग्णालयात पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या एका हाताला आणि एका पायाला दुखापत झाली असून तिच्या ओठांवर जखमा देखील होत्या. तिच्या शरीराला तीन ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहे. तसेच तिच्या गुप्तांगामध्ये मोठी जखम झाली आहे. त्यामुळे ही अपघाताची घटना असू शकत नाही. या तरुणीसोबत काही वाईट घडले असण्याची शंका तरुणीवर उपचार करणारे चिफ मेडिकल ऑफिसर डॉ. ओमकार चौधरी यांनी व्यक्त केली.

दरम्यान सध्या ही तरुणी बेशुद्धावस्थेत आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तरुणीच्या शरीरावर असलेल्या घावांवरून ही घटना २४ तासांमध्ये घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


संतापजनक! पार्टीहून परताना तरुणीवर बलात्कार; गुप्तांगावर केले वार