घरदेश-विदेशमतदानासाठी वापरली जाते 'ही' खास शाई...

मतदानासाठी वापरली जाते ‘ही’ खास शाई…

Subscribe

निवडणुकीच्या काळात मतदानासाठी येणाऱ्या सर्वच मतदारांच्या बोटावर शाई लावली जाते. मतदानामध्ये बहुमतदान, फसवणूक किंवा कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी पक्क्या स्वरुपातील ही शाई मत देऊन आलेल्या उमेदवाराला लावली जाते. शाईने उमटवलेली ही खूण इतकी पक्की असते की पुढील काही दिवस ती बोटावर कायम राहते. यामागचं कारण आहे त्या शाईतील पक्केपणा. या शाईचं एक खास वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यपूर्ण शाईचे श्रेय जाते ते भारतातील कर्नाटक सरकारच्या अखत्यारीतील असलेल्या म्हैसूर पेंटसड् वर्निश लिमिटेड (एमपीव्हीएल) या कंपनीला. बहुतांशी ठिकाणी मतदानासाठी लावण्यात येणारी ही विशेष शाई या कंपनीकडूनच खरेदी केली जाते.


वाचा : महिला जवान घडविण्यासाठी ‘उडान’

भारताबाहेरही अनेक देशांना एमपीव्हीएलकडून या शाईचा पुरवठा केला जातो. गुणवत्तापूर्ण आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या पक्क्या शाईचा पुरवठा करणारी कंपनी अशी ‘एमपीव्हीएल’ कंपनीची विशेषता आहे. याच विशेषतेमुळे प्रयोग शाळा, संशोधन केंद्र तसंच अनेक मोठ्या कंपनीज आणि भारतीय निवडणूक आयोग ही शाई नियमीत तत्वावर खरेदी करतात. अशा प्रकारच्या विश्‍वासार्ह पक्क्या शाईचे एमपीव्हीएल हे एकमेव अधिकृत पुरवठादार आहेत. नवी दिल्लीतील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाकडून १९६२ पासूनच या खरेदीसाठी विशेष परवाना मंजूर करण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाव्यतिरीक्त एमपीव्हीएल १९७६ पासून अन्य २८ देशांना या विशेष शाईचा पुरवठा करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -