सीबीआयला राजकीय कार्यकारिणीतून वेगळे करा – आर.एम. लोढा

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी सरन्यायाधिश आर.एम. लोढा यांना मोठ वक्तव्य केले आहे. सीबीआयला राजकीय कार्यकारिणीतून वेगळे करा अशी टीका त्यांनी केला आहे.

New Delhi
justice r m lodha
आर.एम. लोढा

मागील काही दिवसांपासून केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मध्ये सध्या सावळा गोंधळ सारखी स्थिती बघायला मिळत आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावत त्यांच्यावर खटला भरवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिली. यानंतर त्यांची बदली करण्यात आली मात्र त्यांनी अखेर राजीनामा दिला होता. त्यांच्या या निर्णयावरून आता केंद्र सरकार आणि सीबीआयच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनीही टीका केली आहे.

कोण आहेत लोढा

जस्टिस लोढा यांनी सीबीआयला “पिंजऱ्यात अडकलेला पोपट.” अशी उपमा दिली होती. त्यांच्यामते सीबीआय हा सरकारच्या गुलामाप्रमाणे काम करतो. लोढा म्हणाले की,”पोपटाचा पिंजरा उघडल्या शिवाय तो आकाशात उडू शकत नाही. प्रत्येक सरकार सीबीआयचा वापर करुन घेते. मात्र माझ्यामते हे प्रकरण न्यायालयात आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआय आणि सरकारमधील संबध दिसून आले होते आणि अजूनही ते कायम आहेत. केंद्र सरकारने सीबीआय संचालकांची उचलबांगडी करण्याचा प्रयत्न केला. तपास विभागांंना स्वातंत्रता दिली पाहिजे. वेळ आली आहे सीबीआयला राजकीय कार्यकारिणीतून वेगळे करणे आवश्यक आहे.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here