घरदेश-विदेशजगभ्रमण करणाऱ्या ६ तारिणी गोव्यात दाखल

जगभ्रमण करणाऱ्या ६ तारिणी गोव्यात दाखल

Subscribe

जगभ्रमंती करून सहा महिला नौदल अधिकाऱ्यांसह ‘आयएनएसव्ही तारिणी’ ही बोट आज गोव्यात परतली आहे. गोव्याहून गेल्या ६ सप्टेंबर रोजी ही बोट जगभ्रमंतीसाठी निघाली होती. ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांनी आपल्या या जगभ्रमंतीला सुरुवात केली होती. आज गोव्यात दाखल झाल्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी या सहा महिला नौदल अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने जगभ्रमंती करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असून गेल्या दोन वर्षांपासून याची तयारी करण्यात आली होती. मार्चमध्ये परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आज हा प्रवास पूर्ण झाला. महिला अधिकाऱ्यांच्या या गटामध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश होता.
केवळ महिलाच नाही तर देशातील प्रत्येकाला अभिमान वाटेल असेच कर्तृत्त्व या नौदलाच्या महिलांनी गाजवले आहे. या महिलांचे काही व्हिडिओदेखील आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -