घरदेश-विदेशआता आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय चलनाची किंमत वाढणार

आता आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय चलनाची किंमत वाढणार

Subscribe

व्हेनेझुएलातील तेल भारतीय चलनाने विकत घेण्यासाठी डॉलर्सचा वापर न करता रुपयेचा वापर करण्यात यावा अशी मागमणी केली जात आहे. यामुळे येत्या काळाता आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचा भाव वधारणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलर्स ची किंमत भारतीय चलनाहून (रुपये) अधिक आहे. १ डॉलर ची किंमत ६८.५९ रुपये इतकी आहे. मागील काही वर्षांपासून डॉलरचा भाव वाढत असल्याचे दिसून आले आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे भाव वधारणार असल्याचे चित्र आहे. राजकीय संकट आणि अमेरिकेच्या निर्बंदानंतर व्हेनेझुएला देशाने भारताला एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाअंतर्गत भारत या देशातील तेल विकत घेण्यासाठी डॉलर चलनाचा वापर न करता भारतीय चलनाचा वापर करू शकणार आहे. व्हेनेझुएलाच्या या प्रस्तावाचा भारत गंभीरपणे विचार करत आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना आपल्या पदावरून काढण्यासाठी अमेरिका त्यांच्यावर निर्बंद लावत आहेत. यामुळे या देशातील आर्थव्यवस्था ही थंडावली आहे. भारताने जर व्यायपारात रुपये चलनाचा वापर केला तर आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत भारतीय चलनाचा भाव वाढू शकतो असे मत अर्थतज्ञांनी दिले आहे.

- Advertisement -

व्हेनेझुएलावरील संकट

व्हेनेझुएला हा एक तेल उत्पादन करणारा देश आहे. गल्फ देशांबरोबरच या देशातील तेलालाही आंतराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. या देशाची ९५ अर्थव्यवस्था ही तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. तेल निर्यात करणारा देश असूनही या देशाची अवस्था चांगली नाही. अमेरिकाने या देशावर विविध प्रतिबंद लावले आहेत. यामुळे इतर देशांना या देशासोबत व्यापार करणे जड जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल विकण्यासाठी आतापर्यंत डॉलर चलनाचा वापर केला जात होता.

व्हेनेझुएलाचे भारताशी संबध

भारत आणि व्हेनेझुएला देशातील संबध चांगले आहेत. भारत या देशाकडून तेल आयात करते. मात्र याचे पैसे भारताला परकीय चलनाद्वारे द्यावे लागते. अमेरिकेने लावलेल्या निर्बंदानंतर तेलाची आयात बंद करणार अशी स्थिती निर्माण झाली असतानाच नवीन मार्ग शोधण्यात येत आहे. या अतंर्गत भारतीय चलनाचा वापर केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -