घरदेश-विदेशमेहुल चोकसीला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली

मेहुल चोकसीला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली

Subscribe

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी मेहुल चोकसीच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी मेहुल चोकसीच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. इंटरपोलने सीबीआयच्या सांगण्यावर ही रेड कॉर्नर नोटीस जारी बजावली आहे. मेहुल चोकसी सध्या अँटीगामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी २०१७ साली तेथील नागरिकत्व घेतले होते. मेहुलने भारतात न परतण्याचा नवीन बहाणा शोधला आहे. ते सांगतात की, ते तीन महिन्यांसाठी भारतात येऊ शकतं नाही. त्यांच्या वकिलांनी मुंबईच्या कोर्टात सांगितले की, मेहूल कोणताही प्रवास करण्यासाठी शारीरिकरित्या सक्षम नाहीत.

- Advertisement -

वाचा : ‘इंटरपोल’ म्हणजे काय रे भाऊ…?

काय असते इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस 

लाल रंगाचे नोटीस पत्र आरोपीला अटक करण्यासाठी दिले जाते. मात्र केवळ रेड कॉर्नर नोटीस जारी केलेला व्यक्ती दोषी ठरत नसून त्याच्याविरोधात सबळ पुरावे कोर्टात सादर करावे लागतात.

- Advertisement -

वाचा : भारतात येण्यास मेहुल चोकसी स्पष्ट नकार

वाचा : पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोकसीच्या सहकाऱ्याला अटक

वाचा : माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे – मेहूल चोकसी

काय आहे प्रकरण 

पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी बुडवून पलायन करणाऱ्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय विभागाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले होते. ईडीने १२ हजार पानांची चार्जशीट दाखल केली होती. कोट्यवधीचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या मोदीविरोधात विशेष फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिन्यात पीएनबी घोटाळ्यांतर्गत सीबीआयने २ चार्जशीट दाखल केल्या होत्या. दरम्यान, नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची माहिती ईडीने दिली होती. नीरव मोदीचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असला तरी सध्या तो सिंगापूरच्या पासपोर्टवर विदेशात मुक्तपणे फिरत असल्याचे स्पष्ट झाले.

आरोप फेटाळून लावले 

पीएनबीच्या १३४०० कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरा व्यापारी मेहुल चोकसीने गेल्या वर्षीच व्यवसायवाढीसाठी करेबियन देश अँटिग्वाची नागरिकता घेतली असल्याचा दावा केला होता. अँटिग्वाच्या स्थानिक मीडियानं दिलेल्या बातमीनुसार, चोकसीने अँटिग्वाच्या पासपोर्टवर १३२ देशात विनाव्हिसा फिरण्याची सूट असल्याचा दावा केला होता. ‘डेली ऑबर्झव्हर’नं दिलेल्या बातमीनुसार, चोक्सीच्या वतीनं त्याचे वकील डेव्हीड डोरसेटनं स्पष्टीकरण दिले. या स्पष्टीकरणात भारतीय तपास यंत्रणा आणि मीडियाकडून लावण्यात आलेले आरोप खोटे असून यात कोणतंही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -