घरदेश-विदेशInternational Yoga Day: संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवर झळकतेय सूर्य नमस्काराची योगमुद्रा

International Yoga Day: संयुक्त राष्ट्राच्या इमारतीवर झळकतेय सूर्य नमस्काराची योगमुद्रा

Subscribe

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयांमध्ये हा योग दिवस २१ आणि २२ जून या दोन दिवशी साजरा करण्यात येणार

संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असणाऱ्या इमारतीवर सूर्य नमस्काराची योगासन मुद्राच्या फोटो झळकत आहे. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाची इमारत योगसाधनेत बघायला मिळत आहे. भारताच्या स्थायी मिशनने पाचवा योग दिन उत्सवात साजरा केला असून संयुक्त राष्ट्राच्या इमारातीच्या उत्तर दिशेला हा फोटो दिसत आहे.

- Advertisement -

याच दिवसाचे औचित्य साधत संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमास अनेक अधिकाऱ्याने आपला सहभाग दर्शवला. याशिवाय, भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूत सय्यद अकबरूद्दीन यांच्यासह अनेक आधिकाऱ्यांनी भाग घेतला.

संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयांमध्ये हा योग दिवस २१ आणि २२ जून या दोन दिवशी साजरा करण्यात येणार आहे. तसेच, ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघानं २१ जून हा जागतिक आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषणा केली होती. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनाचा प्रस्ताव सादर केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -