घरदेश-विदेशबलात्कारी नित्यानंदविरोधात आता इंटरपोलची नोटीस

बलात्कारी नित्यानंदविरोधात आता इंटरपोलची नोटीस

Subscribe

बलात्काराच्या प्रकरणात फरार असलेल्या नित्यानंद स्वामीविरोधात आता इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे.

गेल्या २ वर्षांपासून फरार असलेल्या नित्यानंद या ढोंगी स्वामीविरोधात आता इंटरपोलने नोटीस जारी केली आहे. गुजरात पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने ही ब्ल्यू नोटीस जारी केली आहे. २०१८ सालापासून नित्यानंद फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नित्यानंदचा पासपोर्ट रद्द केल्यापासून तो फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर लागल्यापासून आधी तो नेपाळला गेला आणि तिथून अज्ञात स्थळी फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच गुजरात पोलिसांनी इंटरपोलला त्याच्याविरूद्ध नोटीस जारी करण्याची विनंती केली होती.

रेड नव्हे, ब्लू नोटीस!

दरम्यान, इंटरपोलने नित्यानंद विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली असून गुजरात पोलीस मात्र रेड कॉर्नर नोटीससाठी आग्रही आहेत. ब्लू नोटीसनुसार एखाद्या आरोपीविरोधात संबंधित गुन्ह्याची माहिती गोळा करण्याचे अधिकार मिळतात. मात्र, रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यास संबंधित आरोपीला अटक करण्याचे देखील अधिकार मिळतात.

- Advertisement -

नित्यानंद आणि वाद

२०१०मधला नित्यानंदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये काही स्त्रियांसोबत नित्यानंद स्वामी आक्षेपार्ह परिस्थितीमध्ये दिसत आहे. त्यानंतर त्याच्यावर कर्नाटकमध्ये एका प्रकरणात बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. याच संबंधात पोलीस कारवाईची कुणकुण लागताच नित्यानंद फरार झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -