धक्कादायक! दारूच्या नशेत त्याने ३ वर्षाच्या मुलीला जमिनीवर जोरात आपटलं, पत्नीलाही मारहाण

उत्तर प्रदेशच्या जिल्हा गौतम बुद्ध नगरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका मद्यधुंद व्यक्तीने स्वत:च्याच तीन वर्षाच्या मुलीला मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. याशिवाय पत्नीलाही मारहाण केली गेली. पत्नी सध्या रुग्णालयात दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील पोलिस स्टेशन परिसरातील बरौला गावात दारूच्या नशेत अमितचे पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर त्याने आपल्या मुलीची हत्या केली. अमित रोजच दारू पिऊन पत्नीबरोबर भांडत असे तिला मारहाणही करत असे.

त्या दिवशीही तो नशेतच होता. घरी आल्यावर आपल्या बायकोशी भांडला. रागाच्या भरात त्याने आपल्या ३ वर्षाच्या निरागस मुलीला उचलून धरले आणि खाली आपटले. यामुळे मुलगी प्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गंभीर अवस्थेतील पत्नीला रुग्णालयात दाखल केले, तिचीप्रकृती चिंताजनक आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे.


हे ही वाचा – Video : मास्क न घालतलेल्या महिलेला एक हंसाने चांगलीच शिक्षा केलीये, कशी ते तुम्हीच बघा!