घरदेश-विदेशसलग साडेनऊ तास बसणं पडू शकतं महागात; संशोधनाचा निष्कर्ष

सलग साडेनऊ तास बसणं पडू शकतं महागात; संशोधनाचा निष्कर्ष

Subscribe

सगल साडेनऊ तास बैठकीत राहिल्यास लवकरच मृत्यू जोण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकातील प्रकाशित संशोधनात्मक अध्ययनात करण्यात आला आहे. या निष्कर्षानुसार दररोज २४ मिनिटे गतीने चालणे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. यामुळे आरोग उत्तम ठेवण्यासाठी बसून राहण्यापेक्षा शारीरिक हालचाल ठेवणे कधीही फायद्याचे ठरू शकते, असेच या निष्कर्षातून समोर येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १८ ते ६४ वर्षे वयाच्या लोकांनी दर आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटे किंवा किमान ७५ मिनिटे जोमाने शारीरिक हालचाली करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच हा सल्ला स्वत: अंगीकारलेल्या हालचालींवर आधारित आहे. कोणत्या वयात शारीरिक हालचाली जास्त कराव्यात, त्याची तीव्रता किती असावी, याबाबतच कोणतेही नियम नाहीत.

- Advertisement -

नॉर्वेतील ओस्लोस्थित नॉर्वेजियन स्कूल ऑफ स्पोर्ट सायन्सेसचे प्रोफेसर उल्फ एकेलुंद यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी शारीरिक हालचाली आणि हालचालीरहित वेळ आणि मृत्यूस कारक घटक यांच्या परस्परसंबंधाचे विश्लेषण केले आहे. यात एक्सेलेरोमीटरचा (प्रवेगमापक) वापर करण्यात आला. हे उपकरण शरीरावर बांधून जागेपणातील हालचालींची गती आणि तीव्रतेचा माग घेत दिवसभरातील हालचालीचे प्रमाण मोजले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -