घरदेश-विदेशइराणचाही पाकला सज्जड दम

इराणचाही पाकला सज्जड दम

Subscribe

दहशतवादी कारवाया रोखल्या नाही तर आम्हीही घुसून हल्ला करू

पाकिस्तान हा शेजारी देशांच्या सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. तुम्ही कुठल्या दिशेने चालला आहेत? इराणचा संयम पाहू नका, पाकिस्तानने इराणवर होणार्‍या दहशतवादी कारवायांना खतपाणी घातले, तर इराणही पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानला धडा शिकवेल, अशा शब्दांत इराणच्या आयआरजीसी फोर्सचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराला थेट धमकी दिली पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा इराणलाही नाहक त्रास होत आहे.

या संघटनांवर पाकिस्तानकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे इराणही पाकिस्तानच्या सीमारेषेवर भिंत बांधण्याची योजना आखत आहे. तसेच भारताप्रमाणे कारवाई करण्याचेही संकेत पाकिस्तानला दिले आहेत. इराणच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख हेशमातोल्लाह फलाहतफिशेह यांनीही पाकिस्तानला दम भरला आहे.

- Advertisement -

इराणचे कमांडर सोलेमनी यांनी पाकिस्तानला इशारा देत दहशतवादाविरुद्ध भारत-इराण यांच्या घनिष्ट मैत्रीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, सुलेमानी हे अरब देशातील दहशतवादाविरोधात कार्य करतात, असा त्यांचा दावा आहे. तर काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील वॉशिंग्टन टाईम्स या वृत्तपत्राने कासिम सुलेमानी यांना जगातील सर्वात मोठा दहशतवादी असल्याचे संबोधले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -