घरताज्या घडामोडीइमारतीच्या छतावर किस्स केले आणि पुढे...

इमारतीच्या छतावर किस्स केले आणि पुढे…

Subscribe

प्रसिद्ध पार्कर एथलीट्सना इमारतीच्या छतावर चक्क किस्स करताना आढळून आले आहेत.

इराणच्या प्रसिद्ध पार्कर एथलीट्स (Parkour Athletes) ने छतावर असे काही केले, कि संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. अलिरेझा जपालाघी नावाच्या प्रसिद्ध पार्कर एथलीटने आपल्या स्टंट पार्टनरसोबत इमारतीच्या छतावर जाऊन एका कोपऱ्यात दोघांनी किस्स केले. त्यानंतर या दोघांचा फोटो काढण्यात आला आणि तो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनतर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार; तेहरान पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांना ही अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

अर्द्ध सरकारी एजन्सीने सांगितले आहे की, ‘आयएसएनए’ च्या माहितीनुसार, या व्यक्तीला तेहरानच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. ते म्हणाले कि, ‘या दोन व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करुन नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना अटक केली आहे.  – होसेन रहिमी; राजधानीचे पोलीस प्रमुख

अलिरेझा जपालागी याला याप्रकरणी १८ मे रोजी अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असणाऱ्या तरुणीला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, अलिरेझा जपालागी ताब्यात घेतल्यानंतर अनेक नागरिकांनी त्याचे समर्थन करुन त्याची सुटका करण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. अनेक नागरिकांनी ट्विटरद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

फोटो झाला व्हायरल

अलिरेझा जपालागीनचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाला असून त्या फोटोमध्ये तो आपल्या महिला जोडीदारासह इमारतीच्या छतावर एका कोपऱ्यात बसून किस्स करत असल्याचे दिसून येत आहे. इस्लामिक ड्रेस कोड अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी महिला केवळ चेहरा, हात आणि पाय दाखवू शकतात. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – लॉकडाऊन काही संपेना, वधूला धीर धरवेना; सासरी येऊन केले लग्न संपन्न


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -