Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आजपासून ट्रेनची बुकिंग होणार सुपरफास्ट, एका मिनिटात १० हजार तिकीट बुक

आजपासून ट्रेनची बुकिंग होणार सुपरफास्ट, एका मिनिटात १० हजार तिकीट बुक

आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट लाँच करणार आहेत.

Related Story

- Advertisement -

आजपासून ट्रेनची बुकिंग सुपरफास्ट होणार आहे. प्रवाशांना आता ऑनलाईन ट्रेनची बुकिंग करण्यासाठी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. तसेच आता एका मिनिटात एकत्र १० हजार ट्रेनची तिकीट बुकिंग होऊ शकणार आहे. सध्या एका मिनिटात ७ हजार ५०० तिकीट बुकिंग होतात. दरम्यान आज दुपारी १२ वाजता केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट लाँच करण्यात आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयआरसीटीसी वेबसाईट अपडेट झाल्यानंतर तिकीट बुकिंगचा स्पीड वाढणार आहे. प्रवासी पहिल्यापेक्षा अधिक वेगात तिकीट बुकिंग करू शकणार आहेत. तसेच आयआरसीटीसी वेबसाईटवर खाण्या-पिण्यासह इतर सुविधा देखील जोडल्या जाणार आहेत.

रेल्वेच्या टिकटिंग वेबसाईट इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ऑनलाईन प्रवास आरक्षणाची सुविधा देते. अधिकाऱ्यांचा माहितीनुसार, २०१४ नंतरपासून तिकिट बुकिंगसोबत प्रवासाच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की, ‘नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत अधिकाधिक लोक आता आरक्षण काउंटरवर जाण्या व्यतिरिक्त ऑनलाईन तिकिट बुक करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे आयआरसीटीसी वेबसाईटवर सातत्याने अपडेट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न दुप्पट करणे आवश्यक आहे.’ रेल्वे बोर्ड, आयआरसीटीसी, सेंटर फॉर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी गोयला यांना आश्वासन दिले की, ‘वेबसाईटवरील कामकाजात आणखीन सुधारणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’


- Advertisement -

हेही वाचा – यंदा प्रजासत्ताक दिनी परेड पाहण्यासाठी फक्त २५ हजार प्रेक्षकांना परवानगी


 

- Advertisement -