घरदेश-विदेशरेल्वेच्या विलंबामुळे आयआरसीटीसीला लाखांचा भूर्दंड

रेल्वेच्या विलंबामुळे आयआरसीटीसीला लाखांचा भूर्दंड

Subscribe

दिल्ली - लखनऊ तेजस एक्स्प्रेसला तीन तासांहून अधिक विलंब झाल्याने आयआरसीटीसीला लाखांचा भूर्दंड बसाल आहे.

दिल्ली – लखनऊ तेजस एक्स्प्रेसला तीन तासांहून अधिक विलंब झाल्याने आयआरसीटीसीला १ लाख ६२ हजरांचा भूर्दंड बसला आहे. रेल्वेची उपसंस्था असलेल्या आयआरसीटीसीला याप्रकरणी विमा कंपन्यांच्या माध्यमातून ९५० रुपये प्रवाशांना भरपाई म्हणून देण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रवशांना भरपाई देण्यात येणार असल्याने याचा फटका आयआरसीटीसीला बसला आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात गाडीच्या विलंबापोटी प्रवाशांना भरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने दाखल झालेली तेजस एक्स्प्रेस १९ ऑक्टोबर, शनिवारी लखनऊ येथून सकाळी ९.५५ वाजता सुटली होती. पण ही एक्स्प्रेस सकाळी ६.१० वाजता सुटणे अपेक्षित होते. मात्र, सुरुवातीलाच उशीरा सुटलेली एक्स्प्रेस नवी दिल्लीला ३ तास उशीराने दाखल झाली. दरम्यान, नवी दिल्लीहून ३.३५ ला सुटण्याऐवजी सायंकाळी ५.३० वाजता सुटली. त्यामुळे लखनऊला रात्री १०.०५ वाजता पोहोचणे अपेक्षित असताना रात्री ११.३० वाजता पोहोचली. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आणि याचा फटका आयआरसीटीसीला बसला आहे.

- Advertisement -

अशी मिळणार नुकसान भरपाई

लखनऊ ते दिल्ली दरम्यान एक्स्प्रेसमध्ये गाडीत ४५० प्रवासी होते. या प्रवाशांना भरपाई म्हणून प्रत्येकी २५० रुपये देण्यात येणार आहेत. तर दिल्ली ते लखनऊ दरम्यान, ५०० प्रवासी होते, त्यांना प्रत्येकी शंभर रुपये भरपाई मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या प्रवाशांना विमा कंपनीच्या लिंकवरून भरपाई मिळेल. तेजस एक्स्प्रेसच्या तिकिटावर ही लिंक दिलेली आहे.” १९ ऑक्टोबर रोजी कानपूर येथे दुसरी एक रेल्वे रूळावरून घसरल्याने तेजस एक्स्प्रेसला विलंब झाला होता.

असा आहे नियम

आयआरसीटीसीनुसार, तेजस एक्स्प्रेसला एक तासांहून थोडाफार उशीर झाल्यास प्रवाशांना १०० रुपये भरपाई आणि दोन तासांहून अधिक उशीर झाल्यास २५० रुपये भरपाई देण्यात येते.

- Advertisement -

हेही वाचा – तेजस एक्स्प्रेस उशिरा पोहोचल्यास मिळणार प्रवाशांना भरपाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -