घरCORONA UPDATECoronavirus: आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर करणार कोरोनाग्रस्तांवर उपचार

Coronavirus: आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर करणार कोरोनाग्रस्तांवर उपचार

Subscribe

लिओ वराडकर यांनी राजकारणात येण्यापूर्वी डॉक्टर म्हणून काम केलं आहे. त्यांनी सामान्य चिकित्सक म्हणून सात वर्ष काम केलं आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात झपाट्याने वाढत आहेत. कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात सर्व देश वेगवेगळे निर्णय घेत आहेत. त्याचबरोबर आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनीही आपण डॉक्टर म्हणून काम करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी राजकारणात येण्यापूर्वी डॉक्टर म्हणून काम केलं आहे. त्यांनी सामान्य चिकित्सक म्हणून सात वर्ष काम केलं आहे. २०१३ मध्ये त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडला. त्यानंतर ते २०१४ मध्ये आरोग्यमंत्री बनले. आयरिश टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना विषाणूची प्रकरणे वाढल्यानंतर पंतप्रधानांनी पुन्हा वैद्यकीय नोंदणी केली. त्यांच्या पात्रतेनुसार पंतप्रधान आठवड्यातून मोजक्या शिफ्ट करतील.


हेही वाचा – कनिका कपूरने जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई; १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावं लागणार

- Advertisement -

आयर्लंडच्या हेल्थ सर्व्हिस एक्झिक्युटिव्हने (एचएसई) माजी आरोग्य कर्मचार्‍यांना पुन्हा नोंदणीसाठी आवाहन केलं होतं. त्यानंतर आयर्लंडच्या पंतप्रधानांनी डॉक्टर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ४१ वर्षीय पीएम वरदकर हे डॉक्टरांच्या कुटूंबातून आले आहेत. त्यांचे वडील भारतीय डॉक्टर होते, तर आई आयर्लंडमध्ये परिचारिका होती. आयर्लंमध्ये कोरोनाचे ४ हजार ९९४ रुग्ण आहेत. तर १५८ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारपर्यंत जगभरात कोरोना-संक्रमित लोकांची संख्या १२ लाख ७४ हजार ८५७ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ६९ हजार ४९३ झाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -