घरट्रेंडिंगVideo: कबरीतून आला मृत वडिलांचा आवाज आणि....!

Video: कबरीतून आला मृत वडिलांचा आवाज आणि….!

Subscribe

अंतिम संस्कारच्या वेळी मृत वडिलांचा आवाज ऐकून सर्वजण हैराण झाले आणि त्यांना हसू देखील आले.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थोडे भावूक व्हाल. शे ब्रेडली नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यात आला. मात्र, दफन झाल्यानंतरही चक्क तिथे असलेल्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावर हसू होते. कारण शे ब्रेडलीची मृत्यू झाल्यानंतर एक इच्छा होती की, ‘या जगातून जाण्यापूर्वी मी सगळ्या मित्र आणि कुटुंबियांना हसवून जाईल.’ यासाठी त्याच्या मुलाने आणि त्याने हा प्रँक रचला होता.

शे ब्रेडली हा तीन वर्ष कॅन्सरशी झुंज देत होता. आयरिश मिररच्या माहितीनुसार, ‘ब्रेडलीची शेवट इच्छा होती की तो कुटुंब आणि मित्रांसोबत प्रँक करेल.’ मृत्यू झाल्यानंतर ब्रेडलीवर अंतिम संस्कार होत होते. त्यावेळी त्याच्या मुलाने ब्रेडलीच्या आवाजातील रेकॉर्डिंग लावले. या रेकॉर्डिंगमुळे सगळे जण घाबरले होते. रेकॉर्डिंगमध्ये ब्रेडलीचा आवाज होता.

- Advertisement -

रेकॉर्डिंगमध्ये ब्रेडली असं बोला की, ‘हॅलो…हॅलो…हॅलो…मला बाहेर काढा.’ हा आवाज ऐकून आल्यानंतर सर्व जण हैराण झाले. १२ ऑक्टोबरला ब्रेडलीवर अंतिम संस्कार झाले होते. त्याच्या मृत्यू अगोदर त्याने रेकॉर्डिंग केले होते. पुढे रेकॉर्डिंगमध्ये ब्रेडली असं म्हणाला की, ‘मला बाहेर काढा. ही पुजा आहे का? मला आवाज येत आहे. मी ब्रेडली आहे. एका बॉक्समध्ये बंद आहे.’

- Advertisement -

हेही वाचाराहुल गांधी पुन्हा एकदा ट्रोल; व्हायरल होतायत मीम्स

अंतिम संस्कारचा हा व्हिडिओ ब्रेडलीची मुलगी एंड्रिया ब्रेडली हीने शेअर केला आहे. त्याच्या मुलीने हफपोस्टला सांगताना असं सांगितलं की, ‘बाबांनी ही ऑडिओ एक वर्षापूर्वीच रिकॉर्ड करून ठेवली होती. हे सर्व फक्त माझ्या भावाला आणि त्यांच्या भाचीला माहित होते.’

एंड्रिया पुढे असं म्हणाली की, ‘त्यांची इच्छा होती त्याच्या अंतिम संस्कार कोणी रडलं नाही पाहिजे. सर्वजणांनी आनंदाने मला अखेरचा निरोप दिला पाहिजे आणि त्याच्या म्हणण्यानुसार झालं.’ एंड्रियाने ट्विट करताना तिच्या बाबांचा देखील फोटो शेअर केला आहे.


हेही वाचामुंबईतील टिनी मिरॅकल्सला राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमांची भेट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -