घरताज्या घडामोडीपोट आहे की भंगार? खिळे, स्क्रू, सळी पोटात सापडल्यानंतर डॉक्टरही हैराण

पोट आहे की भंगार? खिळे, स्क्रू, सळी पोटात सापडल्यानंतर डॉक्टरही हैराण

Subscribe

रविवारी उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात एक आश्चर्यकारक गोष्ट पाहायला मिळाली. एक रुग्ण पोट दुखीची तक्रार घेऊन चंद्र कुसुम ह़ॉस्पिटलमध्ये गेला होता. त्यावेळेस डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि रिपोर्ट पाहायला तेव्हा डॉक्टरांचे डोळे विस्फारलेले होते. त्या रुग्णाला पोटो दुखी इतर कोणत्या आजारामुळे होत नसून त्याच्या पोटोत लोखंडाच्या छोट्या वस्तू असल्याचे समोर आले.

या रुग्ण मुलाचे नाव करण असून तो शनिवारी रात्री हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्याच्या पोटोत दुखत असल्यामुळे डॉक्टरांनी तपासणी केली. रिपोर्टमध्ये पोटात अजब सामना दिसले. त्यामुळे डॉक्टरांनी इमरजेंसीमध्ये ऑपरेशन थिएटर तयार केले आणि त्वरित ऑपरेशनची तयारी केली. ३ तास हे ऑपरेशन सुरू होते. त्याच्या पोटातल्या वस्तू पाहून डॉक्टर हैराण झाले. त्याच्या पोटातून ३० खिळे, १ स्क्रू ड्रायव्हर आणि लोखंडी सळी काढली. या सर्व वस्तूंचे वजन ३०० ग्रॅम होते.

- Advertisement -

करणची आई म्हणाली की, ‘मागील २ महिन्यांपासून करणच्या पोटात दुखत होते. ज्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला उन्नावसह कानपूरमधील अनेक डॉक्टरांना दाखवले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पोटात दुखणं सुरुच होते. पण नंतर चंद्र कुसुम हॉस्पिटलमध्ये आणले असतात डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन केले. आता मुलगा सुरक्षित आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरपासून मुलाला कोणतीही समस्या नाही आहे. म्हणूनच डॉक्टरांना देवाचे रुप म्हटले गेले आहे.’

डॉक्टर संतोष कुमार या ऑपरेशनबाबत म्हणाले की, ‘हे खूप कठीण ऑपरेशन होते. यामध्ये बराच काळ ऑपरेशन सुरू होते. तसेच खूप चांगल्या टीमद्वारे पवन सिंह आणि डॉक्टर आशिष पुरी, राधा रमन अवस्थी, संतोष आणि सर्वेश आणि सर्व लोकांनी मिळून हे कठीण ऑपरेशन व्यवस्थित पार पाडले. पोटातून स्क्रू ड्रायव्हर, एक सळी, आणि ३० खिळे काढले आणि त्यामध्ये पाच ते सहा छोट्या सुया देखील होत्या. एकूण छोट्या-मोठ्या ३६ वस्तू पोटातून बाहेर काढल्या. या सर्व वस्तूंचे वजन सुमारे ३०० ग्रॅम होते.’

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! गोरेगावमध्ये ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -