गुरुद्वारावर इसीसचा हल्ला; २७ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

गुरुद्वारावर इसीसच्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला असून या हल्ल्याची जबाबदारी इसीसने घेतली आहे.

Kabul
isis claims responsibility massacre 27 sikhs kabul
गुरुद्वारावर आयएसआयएसचा हल्ला

अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे इसीसच्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुरुद्वारावर आत्मघातकी दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये २७ जणांचे प्राण गेले असून ८ जण जखमी झाले आहेत. हल्ल्यावेळी गुरुद्वारामध्ये १५० च्या आसपास भाविक आले होते. हा हल्ला मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.४५ ला करण्यात आला आहे.

हल्लेखोरांची सैतानी मानसिकता उघड

दरम्यान, देशांतील अल्पसंख्यांकंवर झालेल्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून दु:ख व्यक्त केले आहे. तसेच एकीकडे करोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार केला असताना अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करणे भ्याड पणाचे लक्षण आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देत निषेध देखील व्यक्त केला आहे. यावरुन हल्लेखोरांची सैतानी मानसिकता उघड होत आहे.

६ तास हल्ला सुरु

अफगाण वृत्तसंस्थांनुसार हा हल्ला तब्बल ६ तास सुरु होता. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला चार जणांनी मिळून घडवलेला आहे. तसेच या हल्ल्याची जबाबदारी इसीसने घेतली आहे. याआधी देखील इसीसने शीख समुदायावर हल्ले केलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुद्वारातून जवळपास ११ लहान मुलांना वाचविण्यात आले आहे. तर जवळपास ८० जण वाचले आहेत. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्लेखरांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.


हेही वाचा – Coronavirus Live Update: प्रत्येक कामगाराला २ हजार रुपयांचा लाभ मिळणार – निर्मला सीतारामन


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here