घरदेश-विदेशया शक्तीशाली देशाच्या पंतप्रधानाने निकालाच्या आधीच दिल्या मोदींना विजयाच्या शुभेच्छा

या शक्तीशाली देशाच्या पंतप्रधानाने निकालाच्या आधीच दिल्या मोदींना विजयाच्या शुभेच्छा

Subscribe

सतराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. देशातील सर्व ५४२ मतदारसंघात मतमोजणी अजुनही सुरु आहे. मात्र त्याआधीच भाजप आणि मोदी यांच्यावर स्तुतीस्तुमनांचा वर्षाव होऊ लागला आहे. मोदींनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये अनेक देशांमध्ये दौरे केले होते. परराष्ट्र धोरण आणि भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्याच्या दिशेने त्यांनी पावले टाकली होती. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नाही? हे आज संध्याकाळी संपुर्ण निकाल आल्यानंतरच समजेल. मात्र इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच मोदींचे अभिनंदन व्यक्त केले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “हे निकाल जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेतृत्व काय आहे, हे दाखवून देत आहेत. आपण एकत्र येऊन भारत आणि अस्रायलचे संबंध आणखी दृढ करूयात. खुप छान, माझ्या मित्रा”, असे बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -