घरCORONA UPDATECoronavirus: इस्राईल पंतप्रधानांच्या सहाय्यकाला कोरोनाची लागण; पंतप्रधानांना लागण झाल्याचं अस्पष्ट

Coronavirus: इस्राईल पंतप्रधानांच्या सहाय्यकाला कोरोनाची लागण; पंतप्रधानांना लागण झाल्याचं अस्पष्ट

Subscribe

इस्त्रायली माध्यमांनी सांगितलं की, गेल्या आठवड्यात सहायक्काने संसद अधिवेशनात हजेरी लावली होती.

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सहायक्काला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, इस्राईल पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (वय ७०) यांना कोरोनाची लागण झाली की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संसदीय सहाय्यकाने गेल्या आठवड्यात संसदेच्या अधिवेशनात हजेरी लावली होती. त्यावेळी नेतान्याहू तसेच विरोधी पक्षातील सदस्य उपस्थित होते. दरम्यान, आम्ही आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार कारवाई करू, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. संसदीय सहाय्यकाची प्रकृती चांगली आहे, असे इस्त्रायली माध्यमांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – Coronavirus: क्वारंटाईन आणि आयसोलेशनमध्ये फरक काय आहे?

- Advertisement -

याआधी १५ मार्चला खबरदारी म्हणून नेतन्याहूची कोरोना व्हायरससाठी तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. इस्त्राईलमध्ये कोरोनाचे ४ हजार ३४७ रुग्ण असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३४ जण बरे झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपत्कालीन सरकार बनवण्याचा इस्त्राईल सरकारचा प्रयत्न आहे. आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या हजारोंच्या संख्येने होऊ शकते असा इशारा दिला आहे. त्यानंतर नेतान्याहू सोमवारी देशातील लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावणार होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -