घरCORONA UPDATECoronavirus: इस्त्राईलचे आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus: इस्त्राईलचे आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात याकोव लिट्झमन आणि त्यांची पत्नी सध्या ठीक आहेत, असं म्हटलं आहे.

कोरोना विषाणूने इस्त्राईलला आपल्या विळख्यात घेतले आहे. इस्त्राईलमध्ये कोरोनाचे ६ हजार २११ रुग्ण आहेत. दरम्यान, इस्त्राईलमधून मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायलचे आरोग्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर दोघांनाही आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे. इस्त्राईलच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, इस्त्राईलचे आरोग्यमंत्री याकोव लिट्झमन आणि त्यांची पत्नी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मात्र, त्यांची प्रकृती ठीक आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे जवळचे सहकारी ७१ वर्षीय याकोव लिट्झमन अनेकदा पंतप्रधानांसमवेत कोरोना विषाणूविषयी माहिती देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. मात्र, आता कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे.


हेही वाचा – अमेरिकेत प्रेतांचा खच; एका दिवसात १ हजार जणांचा मृत्यू

- Advertisement -

याकोव लिट्झमन, तथापि, गेल्या आठवड्यात हजर झाले नाहीत आणि त्यांची जागा मंत्रालयाचे महासंचालक रोजोना यांनी घेतली. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की याकोव लिट्झमन आणि त्यांची पत्नी सध्या ठीक आहेत. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. गेल्या दोन आठवड्यांमध्ये याकोव आणि त्यांच्या पत्नीच्या संपर्कात असलेल्यांना आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे.

संसदीय सहाय्यक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी सोमवारी कोरोना विषाणूची तपासणी केली असून त्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. पंतप्रधान नेतान्याहू बुधवारपर्यंत आयसोलेशन वार्डमध्ये होते. याआधी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सहायक्काला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -