घरदेश-विदेशइस्त्रोचा उपग्रह घेणार बेपत्ता एएन- ३२ विमानाच्या शोध

इस्त्रोचा उपग्रह घेणार बेपत्ता एएन- ३२ विमानाच्या शोध

Subscribe

बेपत्ता विमानाचा शोध इस्त्रोच्या सेटेलाईटच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. भारतीय वायुदल आणि उपग्रह यंत्रणा या विमानाचा शोध घेत आहेत.

भारतीय वायुदलाचे एएन-३२ विमान बेपत्ता होऊन दोन दिवस झाले तरी देखील विमानाचा शोध लागला नाही. या विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय वायुदलाकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आता या विमानाचा शोध इस्त्रोच्या सेटेलाईटच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. भारतीय वायुदल आणि उपग्रह यंत्रणा या विमानाचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

असे झाले विमान बेपत्ता ?

भारतीय वायुदलाचे एएन- ३२ या विमानाने सोमवारी दुपारी आसामच्या जोरहाट एयरबेसवरुन उड्डाण घेतले होते. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये अरुणाचल प्रदेशच्या मेचुका एयरफील्डवरुन ते बेपत्ता झाले. हा भाग चीनच्या सीमेपासून जवळ आहे. जोरहाट एयरबेसवरुन या विमानाने सोमवारी १२ वाजून २५ मिनिटाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर या विमानाचा संपर्क दुपारी १ वाजता तुटला. या विमानामध्ये ८ क्रू मेंबर आणि ५ प्रवासी असे एकूण १३ जण प्रवास करत होते.

बेपत्ता विमानाचा शोध सुरु

बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय वायुदलाने एक सुखोई-३० आणि सी-१३० स्पेशल ऑप्स एयरक्राफ्ट लाँच करण्यात आले. ज्याठिकाणी विमानाचा संपर्क तुटला त्याठिकाणी शोधमोहिम सुरु करण्यात आली. मात्र विमानाचा शोध लागला नाही. ज्या ठिकाणी हे विमान बेपत्ता झाले त्याभागात मोठ्या पर्वतरांगा आणि दाट जंगल आहे. दरम्यान, या विमानाच्या शोधासाठी मंगळवारी इस्त्रोने आपली RISAT मालिकेची रडार्स या विमानाच्या शोधासाठी तैनात केली आहे. मात्र, ईशान्येकडे असलेल्या ढगाळ वातावरणामुळे या शोधकार्यात अडथळे येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – 

वायुदलाचे एएन-३२ विमान बेपत्ता; १३ जण करत होते प्रवास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -