घरदेश-विदेशकेरळवासियांच्या मदतीला धावले 'इस्रो'

केरळवासियांच्या मदतीला धावले ‘इस्रो’

Subscribe

इस्रोचे कार्टोसॅट आणि रिसोर्ससॅट त्यांच्या कॅमेऱ्यातून हाय रिझ्युलेशनचे फोटो पाठवत आहेत. या फोटोमुळे मदतीला अधिक मदत होत आहे. आतापर्यंत या फोटोंच्या मदतीच्या आधारे रेस्क्यू करण्यात आले आहे.

केरळमध्ये सध्या पूरपरिस्थिती आहे. आतापर्यंत १५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण या पूरात अडकले असून त्यांना पूरातून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये इस्रोची मोठी मदत होत आहे. कारण इस्रोच्या सॅटेलाईटमुळे पुराचे रिअल टाईम फोटो मिळत असल्यामुळे येथील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठी मदत होत आहे.

इस्रोच्या सॅटेलाईटची मदत

इस्रोचे पृथ्वीचा अभ्यास करणारे पाच यान अंतराळात आहेत. यात ओशिअनसॅट २, रिसोर्ससॅट २, कार्टोसॅट २ आणि २ ए, इनसॅट ३ डीआर यांचा समावेश आहे. या यानाकडून रिअल टाईम फोटो पाठवण्यात आले. या फोटोवरुनच पूरपरिस्थितीचा अंदाज हवामान विभागाला येत आहे. शिवाय ओशिअनसॅट-२ समुद्रातील वातावरणाचा अभ्यास करुन त्यानुसार समुद्रात वाहणारे वारे आणि पुढील काळात पुराचा धोका या विषयी अधिक माहिती इस्रोचे यान देत आहेत. याशिवाय त्यामुळे रेस्क्यू करण्यास मदत होत आहे.

- Advertisement -
CARTOSAT-2-ISRO
इस्रोचे कार्टोसॅट २ 

पूरपूर्वपरिस्थितीचाही अंदाज

इस्रोचे कार्टोसॅट आणि रिसोर्ससॅट त्यांच्या कॅमेऱ्यातून हाय रिझ्युलेशनचे फोटो पाठवत आहेत. या फोटोमुळे मदतीला अधिक मदत होत आहे. आतापर्यंत या फोटोंच्या मदतीच्या आधारे रेस्क्यू करण्यात आले आहे. हे यान पूरपरिस्थितीवर कायम लक्ष ठेवून आहेत. यानाने पाठवलेल्या अहवालाचा अभ्यास शास्त्रज्ञ करत असून त्यांना यानाने पाठवलेल्या अहवालाची मदत होत आहे. या माहितीच्या आधारे अनेकांना आतापर्यंत पूरातून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

५०० कोटींची मदत

केरळमधील पूरपरिस्थिती पाहता आता ५०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. ९ ऑगस्टपर्यंत मृतांचा आकडा १९६ पर्यंत गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या परिस्थितीचा हवाई आढावा घेतल्यानंतर या ठिकाणी मदत जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -