नोटबंदीसाठी जबाबदारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे – राहुल गांधी

८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी करण्यात आली. त्यावेळी एक हजार आणि ५०० रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्यात आल्या.

New Delhi
rahul gandhi
राहुल गांधी

नोटबंदीच्या निर्णयाला आज ३ तीन वर्ष पूर्ण झाली. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, अनेकांना जीव गमवावा लागला, असे ट्विट करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नोटबंदीच्या हल्ल्यामागे ज्या व्यक्ती असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राहुल यांनी ट्विटमध्ये केली आहे. दरम्यान ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी करण्यात आली. त्यावेळी एक हजार आणि ५०० रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्यात आल्या.

राहुल गांधींनी काय लिहिलंय?

८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशात नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार चलनातील जुन्या ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा बंद करण्यात आल्या. केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोधकांनी कडाडून विरोध केला होता. आज या घटनेला तीन वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. एवढेच नाही तर नोटबंदीच्या हल्ल्यामागे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना शिक्षा व्हायला हवी अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांचे ट्विट

नोटबंदीच्या दहशतवादी हल्ल्याला आज तीन वर्षं पूर्ण झाली. या निर्णयामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अनेक लहानसहान उद्योग ठप्प पडले. त्याचप्रमाणे लाखो नागरिक बेरोजगार झाले. जे कोणी या प्राणघातक हल्ल्याला जबाबदार आहेत त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here