घरदेश-विदेशजैन मुनी तरुण सागर यांचे निधन

जैन मुनी तरुण सागर यांचे निधन

Subscribe

जैन मुनी तरुण सागर यांचे दिल्लीमध्ये निधन झाले आहे. दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते.

जैन मुनी तरुण सागर यांचे दिल्लीमध्ये निधन झाले आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज पहाटे ३ वाजून १८ मिनीटांनी त्यांचे निधन झाले. दुपारी ३ वाजता दिल्लीतर मेरठ मार्गावरील तरुणसागरम तीर्थ येते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

जैन मुनी तरुण सांगर यांना कावीळ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. उपचार करुन देखील त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने त्यांनी डॉक्टरांना उपचार करु नका अशी विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. आज पहाटे अखेर त्यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -