साऊथ आफ्रिकेची जोजिबीनी टुंजी हिने ‘मिस युनिव्हर्स २०१९’चा किताब जिंकल्यानंतर आता जमैकाची टोनी एन सिंह हिने जगातील ‘मिस वर्ल्ड २०१९’चा किताब जिंकला आहे. शनिवारी रात्री लंडनमध्ये पार पडलेल्या ‘मिस वर्ल्ड २०१९’ची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत फ्रान्सची ओफिनी मेजिनो ही फर्स्ट रनरअप ठरली तर भारताची सुमन राव ही सेकंड रनरअप ठरली. टोनीचे नाव मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरमन जुलिया मॉर्ले यांनी घोषित केले. तर मिस वर्ल्ड व्हेनेसा पोन्से हिने टोनीला मिस वर्ल्डचा मुकुट घातला. टोनीने तिच्या यशाचे श्रेय आपल्या आईला दिले आहे.
#MissWorld2019 crowning moment…#MissWorld #London pic.twitter.com/oCvrD5s0TN
— Miss World (@MissWorldLtd) December 14, 2019
मिस वर्ल्ड स्पर्धेचे हे ६९ वे वर्ष होते. यंदाची स्पर्धा ही इंग्लंड मधील लंडन येथे पार पडली. १०० पेक्षा अधिक देशांच्या सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. २०२० ची मिस वर्ल्ड ही स्पर्धा थायलंड येथे होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली.
नक्की वाचा – साऊथ आफ्रिकेची जोजिबीनी टुंजी ठरली यंदाची मिस युनिव्हर्स!
टोनीचा जमैकाच्या मोरेट येथे जन्म झाला असून नवव्या वर्षी टोनी आपल्या कुटुंबासोबत अमोरिकेत स्थायित झाली. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमधील टोनी ही मानसशास्त्राची विद्यार्थीनी आहे. टोनीचे वैद्यकीय डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. टोनीला स्वयंपाक करणे, ब्लॉगिंग करणे, गाणं गाणे आणि समाजसेवा करणे फार आवडते. कॅम्पसमध्ये तिने कॅरिबियन विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसंच ती क्लासिकल ऑपेरा सिंगर देखील आहे.
हेही वाचा – भारताची सुमन राव Miss World स्पर्धेत तृतीय