घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये चार दिवसानंतर कर्फ्यू मागे; मात्र रात्रभर कर्फ्यू राहणार सुरु

काश्मीरमध्ये चार दिवसानंतर कर्फ्यू मागे; मात्र रात्रभर कर्फ्यू राहणार सुरु

Subscribe

चार दिवसानंतर हा कर्फ्यू मागे घेण्यात आला आहे. प्रशासनाने फक्त दिवसाचा कर्फ्यू मागे घेतला मात्र रात्री फर्फ्यू सुरुच राहणार आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभारामध्ये आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलने करण्यात आली. या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. चार दिवसानंतर हा कर्फ्यू मागे घेण्यात आला आहे. प्रशासनाने फक्त दिवसाचा कर्फ्यू मागे घेतला मात्र रात्री फर्फ्यू सुरुच राहणार आहे. आजपासून जम्मू-काश्मीरमधील व्यवहारांना सुरुवात झाली. जम्मूमधील शाळा, दुकान तसंच बाजारपेठा सुरु झाल्या. विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकानुसारच परिक्षा होणार आहेत. तसंच सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांना चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू सुरुच

जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून दिवसाचा कर्फ्यू मागे घेण्यात आला आहे. मात्र रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू सुरुच राहणार आहे. मात्र कलम १४४ लागूच राहणार आहे. तसंच जम्मू-काश्मीरमधील सर्व दारूचे दुकान आणि बार बंद ठेवण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर उपायुक्त रमेश कुमार आणि एसएसपी तेजेंद्र सिंह यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सांगितले की, जम्मू शहरामध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सर्व परिसरातील वातावरण सामान्य वाटले. काहीच अनुच्चित प्रकार घडला नाही. सामान्य परिस्थिती झाली अल्याचे पाहता कर्फ्यू काढण्यात आला.

- Advertisement -

 

शाळा सुरु मात्र कॉलेज बंद

दिवसा दरी कर्फ्यू काढण्यात आला असला तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू कायम असणार आहे. शाळा खोलण्यात आल्या मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव कॉलेज बंद राहणार आहे. तसंच सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देखिल सुरु राहणार आहे. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये टू-जी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभर कर्फ्यूमध्ये सूट देण्यात आली. त्यामुळे सर्व बाजारपेठा खोलण्यात आल्या होत्या. नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. बाजारपेठेतील गर्दीवर पोलिसांचे लक्ष कायम राहणार आहे. सर्व भागामध्ये आता जनजीवन सामान्य स्वरुपात सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -