घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये ५० हजार रिक्त जागा भरणार; राज्यपालांची घोषणा

जम्मू-काश्मीरमध्ये ५० हजार रिक्त जागा भरणार; राज्यपालांची घोषणा

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमधील सद्य स्थितीविषयी सुद्धा माहिती दिली.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर आता काश्मीरमधील तरुणांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी खात्यात ५० हजार रिक्त जागांसाठी लवकरच भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिली आहे. काश्मिरी तरुणांनी या नोकरभरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहनसुद्धा सत्यपाल मलिक यांनी केले आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्याचा विकास व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisement -

काय म्हणाले राज्यपाल मलिक?

आयोजित पत्रकार परिषदेत राज्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमधील नोकरभरती विषयी माहिती दिली. ते म्हणाले की, ”जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आल्यानंतर आता राज्याच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या सहा महिन्यात जम्मू-काश्मीरमधील अनेक महत्त्वाची कामं करण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्राच्या विविध मंत्रालयाच्या बैठका सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यात सर्व सरकारी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. काश्मीरी तरूणांनी या नोकरभरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा – राहुल गांधी आणि चुंबन; नेमकं चाललंय तरी काय?

म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा खंडित केली

पत्रकार परिषदेत राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये खंडित करण्यात आलेल्या इंटरनेट सेवे मागील कारणसुद्धा सांगितले. ते म्हणाले की, ”काश्मीरमध्ये दहशतवादी आणि पाकिस्तानी फोन आणि इंटरनेटचा वापर करत होते. इंटरनेटद्वारे ते काश्मीरी जनतेच्या भावना भडकत होते. भारताविरोधात त्यांचा हत्यार म्हणून वापर करण्यात येत होता. त्यामुळेच जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवा हळूहळू पूर्वपदावर येईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. कुपवाडा आणि हंदवाडामध्ये मोबाईल फोन सेवा सुरू करण्यात आली असून लवकरच इतर जिल्ह्यांमध्ये देखील ही सेवा सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ”काश्मीर मधील परिस्थिती बाबत अनेक अफवा पसरवण्यात येतात. राज्यात काही आंदोलनं झाली असली तरी या आंदोलनांमध्ये एकाचासुद्धा मृत्यू झालेला नाही. प्रत्येक काश्मीरी नागरिकाचा प्राण आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -