घरदेश-विदेशपाकिस्तानच्या हल्ल्यात भारताच्या जवानाला वीरमरण

पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताच्या जवानाला वीरमरण

Subscribe

जम्मूमधील कृष्णाघाटी परिसरात पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये एका जवानाला वीर मरण आले आहे.

जम्मू काश्मीर राज्य पूनर्रचना विधेयक आणि कलम ३७० हटवण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र गेल्या २–३ दिवसांपासून काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असताना आज जम्मूमधील कृष्णाघाटी परिसरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. शहीद जवानाचे नाव नाईक रवी राजन कुमार सिंह असल्याचे समोर आले आहे. तसेच पाकिस्तानच्या या गोळीबारामुळे चार जण जखमी झाले असून जखमींना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने आंततराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रांमध्ये नाचक्की झाल्याने आता पाकिस्तानने आपला मोर्चा काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याकडे वळवला आहे. दरम्यान, आज जम्मूमधील कृष्णाघाटी परिसरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. दरम्यान, भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने स्थानिक रहिवाशांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पाकिस्तानकडून होत असलेल्या भारतीय सुरक्षा दलांनीही पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – INX Media case – पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला; अटकेची शक्यता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -