घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये बस दरीत कोसळली; ११ जण ठार

जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये बस दरीत कोसळली; ११ जण ठार

Subscribe

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये शनिवार, ८ नोव्हेंबरला बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु 

मिळालेल्या माहितीनुसार, लूरन येथून शनिवारी बस पूंछ येथे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -