घरदेश-विदेशलष्करी तळावर दहशतवादी हल्ला; शोपियांमध्ये चकमक

लष्करी तळावर दहशतवादी हल्ला; शोपियांमध्ये चकमक

Subscribe

शोपियांच्या अहगम भागामध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला असून दहशतवाद्यांमध्ये आणि जवानांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या सीमाभागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहेत. जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये झालेल्या चकमकीनंतर आज शोपियांमधील अहगम स्थित ४४ राष्ट्रीय रायफल्स कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला आहे. तसेच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली असून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे.

- Advertisement -

याआधी प्रजासत्ताक दिनी श्रीनगर बाह्य भाग खोनमोह परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली होती. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. तसेच त्यांच्याकडून दोन एके ४७ रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला होता. चकमकस्थळी ५० राष्ट्रीय रायफल्स, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि श्रीनगर पोलिसांनी संयुक्त अभियान देखील चालवण्यात आले होते.

बडगाम चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चारी शरीफ परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी चकमक झाली. या चकमकी दरम्यान, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तसेच जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने याआधी १७ जानेवारी रोजी पाकिस्तानी सैन्यावर मोठी कारवाई केली होती.

- Advertisement -

वाचा – शोपियांमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -