जम्मू-काश्मीरमद्ये प्रवासी बस नदीत कोसळली; ११ प्रवाशांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाला आहे. चिनाब नदीमध्ये प्रवासी बस कोसळली. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी झाले आहेत.

Jammu-Kashmir
mini bus fell in chinab river
प्रवासी बस चिनाब नदीत कोसळली

जम्मू-काश्मीरमद्ये प्रवासी बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. किश्तवाडमध्ये ही घटना घडली आहे असून चिनाब नदीत बस कोसळली. या अपघातामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना हेलिकॉप्टरने नेऊन जम्मू हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली

किश्तवाडच्या टकीरे भागामध्ये प्रवासी बस दरीत कोसळून चिनाब नदीमध्ये पडली. चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. या बसमधून २५ जण प्रवास करत होते. घटनास्थळी जवान, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्य करत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

याआधी झाले होते दोन अपघात 

९ सप्टेंबरला किश्तवाडमध्ये कार आणि बसचा भीषण अपघात झाला होता. या अरघातामध्ये चार लोकं गंभीर जखमी झाले होते. त्याआधी भाविकांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता तर ८ जण गंभीर जखमी झाले होते.