घरदेश-विदेशमोदी सरकारने जे हिसकावून घेतलं ते परत मिळवणार; मेहबुबा मुफ्ती यांचा इशारा

मोदी सरकारने जे हिसकावून घेतलं ते परत मिळवणार; मेहबुबा मुफ्ती यांचा इशारा

Subscribe

पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा (Jammu and Kashmir People’s Democratic Party) आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची तब्बल १४ महिन्यांनंतर नजरकैदेतून सूटका करण्यात आली आहे. सूटका होताच मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील मोदी सरकारला इशारा दिला आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी कलम ३७० परत मिळवणार अशी घोषणा केली असून यासाठी काश्मिरी जनतेला हाक दिली आहे. १ मिनिट २३ सेकंदाचा एक ऑडिओ मेसेज जारी करत त्या म्हणाल्या की, त्या काळ्या दिवसाचा काळा निर्णय त्यांना अजूनही खटकत आहे. केंद्राने जे हिसकावून घेतलं ते परत मिळवणार, असा इशारा मेहबूबा मुफ्ती यांनी मोदी सरकारला दिला आहे.

- Advertisement -

पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांना प्रशासनाने मंगळवारी १४ महिन्यांच्या कालावधीनंतर नजरकैदेतून सूटका केली आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्टला कलम ३७० हटवण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाच्या नेत्यांना केंद्र सरकारने ताब्यात घेतलं होतं. यामध्ये मेहबुबा मुफ्ती यांचाही समावेश होता.

या सुटकेनंतर एक ऑडिओ मेसेज प्रसिद्ध करताना मेहबुबा म्हणाल्याएक वर्षापेक्षा अधिक काळ कैदेत राहिल्यानंतर मला सोडण्यात आलं आहे. ५ ऑगस्ट २०१९ या काळ्या दिवशी घेण्यात आलेला निर्णय माझ्या ह्रदयावर घाव घालत राहिला. मला विश्वास आहे की, अशीच परिस्थिती जम्मू काश्मीरमधील लोकांची असेल. या सरकारनं लोकांचा जो अपमान केला आहे, जनता तो विसरणार नाही. आता आपल्याला निर्धार करावा लागेल की, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीनं बेकायदेशीरपणे जे हिसकावून घेतलं, ते परत घ्यावं लागेल.”

- Advertisement -

“कलम ३७० हटवणे एक बेकायदेशीर निर्णय होता. पण जम्मू काश्मीरमधील जनता हा निर्णय बदलण्यासाठी एकजुटीनं लढतील आणि हजारोंचे जीव घेणारे मुद्दे निकाली काढण्यासाठी सोबत मिळून काम करतील. हा संघर्ष सोपा असणार नाही. मला सोडण्याबरोबरच जम्मू काश्मिरातील तुरूंगामध्ये ठेवण्यात आलेल्या नागरिकांना तातडीनं मुक्त करण्यात यावं,”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -