जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक; एकाचा मृत्यू, एकाला अटक

जम्मू - काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आंदोलकांकडून करण्यात आलेल्या दगडफेकमध्ये एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.

Jammu & Kashmir
Jammu & Kashmir Police: The stone pelter has been identified and arrested
जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात रविवारी सायंकाळच्या वेळेस आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

नेमके काय घडले?

जम्मू काश्मीरमधील जरादीपुरा उरानहाल येथे राहणारे ट्रक चालक नूर मोहम्म्द डार रविवारी सायंकाळी घरी जात होते. त्यादरम्यान, आंदोलकांना ती गाडी सुरक्षा रक्षकांची वाटल्याने त्यांनी त्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत नूर मोहम्मद डार यांच्या डोक्याला दुखापत झाली. ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान , दगडफेक करणाऱ्या एका आरोपीची ओळख पटली असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी श्रीनगर येथील संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षकाच्या स्थानिक कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आवाहन करणारी भित्तीपत्रके फुटीरतावाद्यांनी काही ठिकाणी लावल्याने याठिकाणी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काश्मीरमधील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात संचारबंदीसह लागू केलेले काही निर्बंध मागे घेण्यात आले होते. जागोजागी लावलेले बॅरिकेटस् काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे रसत्यावर लोकांची वर्दळ व वाहनांची येजा सुरू झाली होती. मात्र, राज्यातील सर्व बाजारपेठा अद्यापही बंद आहेत.


हेही वाचा – मोदी हिंदीत बोलले, मग बेअर ग्रिल्सला कसं कळायचं?