घरदेश-विदेशजगभरात इतक्या मुलांची जन्मतारिख असणार १ जानेवारी २०२१

जगभरात इतक्या मुलांची जन्मतारिख असणार १ जानेवारी २०२१

Subscribe

जगभरात नवीन वर्षांत एकूण ३ लाख ७१ हजार ५०४ मुले जन्माला येतील अशी अपेक्षा आहे. एका अभ्यासात असा अंदाज लावण्यात आला आहे की, २०२१ मध्ये जगात एक अब्ज चार दशलक्ष मुले जन्माला येतील.

नवीन वर्ष सर्वासाठी आनंद घेऊन आले आहे. नवीन वर्षात अनेक आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत. भारत अधिक लोकसंख्या असलेला देश आहे. प्रत्येक मिनिटाला कोणीतरी जन्माला येत असते तर प्रत्येक मिनिटाला एक नवा जिव जन्माला येतो. २०२१ या नव्या वर्षात जगभरात ६० हजार महिलांच्या प्रसृती झाल्या आहेत. जगभरात आज ३.७ लाख नवे जिव जन्माला आले. डेटा युनिसेफच्या नोंदणी डेटा आणि घरांच्या अहवालावरून ही माहिती देण्यात आली आहे.

युनिसेफने हि आकडेवारी काढण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या जीवन अपेक्षेचा अहवालाचा अभ्यास केला आहे. भारतात नवीन वर्षांत इतकी मुले जन्माला आली असली तरी गेल्या वर्षांच्या तुलनेत ही आकडेवारी फार कमी आहे. जगभरात नवीन वर्षांत एकूण ३ लाख ७१ हजार ५०४ मुले जन्माला येतील अशी अपेक्षा आहे. एका अभ्यासात असा अंदाज लावण्यात आला आहे की, २०२१ मध्ये जगात एक अब्ज चार दशलक्ष मुले जन्माला येतील.

- Advertisement -

कोणत्या देशात किती मुले?

भारतात ५९ हजार ९९५ मुले जन्माला आली. तर चीनमध्ये ३५ हजार ६१५मुलांनी जन्म घेतला.
नाइजेरीया १२ हजार ४३९, पाकिस्तानमध्ये १४ हजार १६१, इंडोनेशियात  १२ हजार ३३६ मुले जन्माला आली आहेत. इथियोपियामध्ये २०२१मध्ये १२ हजार ६ मुले जन्माला आली. यूएसमध्ये  १० हजार ३१२ तर इजिप्तमध्ये ९ हजार ४५५, बांग्लादेशमध्ये  ९ हजार २३६ आणि कांगोमध्ये  ८ हजार ६४० मुले जन्माला आली आहेत.


हेही वाचा – भारत-ब्रिटनची विमान सेवा सुरु; ८ जानेवारीपासून विमानं घेणार उड्डाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -