CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये आणीबाणी!

युरोप देशांच्या तुलनेत जपानमधील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी आहे.

Tokyo
japan pm proposes state of emergency over corona virus
CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये आणीबाणी!

जपानमध्ये कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. जपान देशाची राजधानी असलेल्या टोकियो शहरा व्यक्तरिक्त बऱ्याच भागात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जपान सरकारने आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रविवारी टोकियोमध्ये कोरोनाचे १४८ रुग्ण आढळले. त्यामुळे हे लक्षात घेऊन सरकार काही कठोर पावले उचलण्याचा विचार करीत आहे.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे मंगळवारी देशाला संबोधित करणार आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना जपानचे पंतप्रधाने यांनी सांगितले की, कोरोनाला लढा देण्यासाठी आपण आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आज ते तज्ञांची भेट घेणार होते असे म्हटले जात होते. या जागतिक साथीचा धोका लक्षात घेता तज्ञांनी सरकारवर कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कदाचित कोरोनामुळे मंगळवारपासून जपान आणीबाणी लागू होण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे.

जपानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. युरोपचा देशांच्या तुलनेत जपानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. आतापर्यंत जपानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ८८० आहे. त्यापैकी ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील आतापर्यंतची कोरोनाग्रस्तांची संख्या १३ लाखांहून अधिक झाली आहे. त्यापैकी ७२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Video: हवेत गोळीबार करणाऱ्या भाजप महिला नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल