राम मंदिर बांधण्यावरुन जैश-ए-मोहम्मदचा मोरक्याची भारताला धमकी

भारतात बाबरी मस्जिदीच्या जागी राम मंदिर बांधले गेले तर दिल्लीपासून ते काबूलपर्यंत मुस्लिम तरुण बदला घेण्यासाठी तयार आहेत. दिल्लीपासून काबूलपर्यंत विध्वंस माजवू अशी धमकी मसूदने दिली.

Delhi
masood azhar
मसूद अजहर

आयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू संघटनांना धावू आल्या आहेत. राम मंदिर बांधण्यावरुन भारतामध्ये सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. असे असताना आता जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मोरक्या मसूद अजहर याने भारताला धमकी दिली आहे. मसूद अजहर याने ९ मिनिटाचा ऑडिओ जारी केला आहे. या ऑडिओद्वारे मसूद अजहर भारताला धमकी देत आहे. जर भारतात बाबरी मस्जिदीच्या जागी राम मंदिर बांधले गेले तर दिल्लीपासून ते काबूलपर्यंत मुस्लिम तरुण बदला घेण्यासाठी तयार आहेत. दिल्लीपासून काबूलपर्यंत विध्वंस माजवू अशी धमकी दिली. मसूद अजहरच्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

बाबरी मस्जिद बोलावत आहे

मसूदने भारताला धमकी देत एक ९ मिनिटाचा ऑडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने काबूल आणि जलालाबादमधील भारतीय संस्थांना लक्ष्य केले आहे. त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, आमची बाबरी मस्जिद पाडून त्याठिकाणी मंदिर बांधले. तिथे हिंदू लोक त्रिशूल घेऊन एकत्र आले आहेत. मुसलमानांना घाबरवले जाते. पुन्हा एकदा आम्हाला बाबरी मस्जिद बोलावत आहे. ऑडिओमध्ये मसूद बोलतोय की, आम्ही बाबरी मस्जिदीवर नजर ठेवून आहोत. तुम्ही पैसा खर्च करण्याची शक्ती ठेवत असाल तर आम्ही बाबरीसाठी आमचे आयुष्य खर्च करायला तयार आहोत. जर आयोध्येत राम मंदिर बांधले गेले तर दिल्लीपासून काबूलपर्यंत धमाके केले जातील.

मोदी निवडणुकीसाठी हे करत आहेत

ऐवढेच नाही तर या ऑडिओमध्ये करतारपूर कॉरिडोरबद्दल मसूद बोलला आहे. त्याने पाकिस्तान सरकारद्वारे भारताच्या मंत्र्यांना बोलवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तसंच त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देखील टीका केली आहे. हे सर्व मोदी निवडणुकीसाठी करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here