घरदेश-विदेशअरविंद सावंत यांचं खातं प्रकाश जावडेकर सांभाळणार

अरविंद सावंत यांचं खातं प्रकाश जावडेकर सांभाळणार

Subscribe

अरविंद सावंत यांच्याकडे असलेलं अवजड उद्योग खातं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा काही केल्या सुटत नाही आहे. त्यातच काल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा काल सुपूर्द केला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. त्यामुळे अरविंद सावंत यांच्याकडे असलेलं अवजड उद्योग खातं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

…म्हणून अरविंद सावंत यांनी दिला राजीनामा

अरविंद सावंत यांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपूर्द केला. यावेळी ते म्हणाले की भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. राज्यात ५०-५० चा फॉर्म्युला करण्याचे ठरले होते. मात्र भाजपने तसे केले नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

अरविंद सावंत यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय होतं

शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे?, असे ट्विट करत त्यांनी आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत असे स्पष्ट केले आहे. आपला निर्णय जाहीर करताना सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर ताशेरे ओढले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले होते. दोन्ही पक्षांना हे सूत्र मान्य होते. आता हे सूत्रच नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत भाजपने महाराष्ट्रात फारकत घेतलीच आहे, अशा शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडत अरविंद सावंत यांनी युती तोडल्याचा दोष भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -