Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश नेहरूंच्या 'त्या' पत्रामुळे काँग्रेसची गोची!

नेहरूंच्या ‘त्या’ पत्रामुळे काँग्रेसची गोची!

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पं. जवाहरलाल नेहरू यांचं एक पत्र भाजपच्या हाती लागलं असून त्या काळात सुद्धा केंद्र सरकार विरूद्ध रिझर्व्ह बँक यांच्यात वाद झाल्याचं या पत्रामधून समोर येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या वेळीही जवाहरलाल नेहरू यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणांना विरोध करणारीच भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेसच्या सगळ्या विरोधातली हवाच निघून गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Related Story

- Advertisement -

काही दिवसांपासून भाजप सरकारकडून रिझर्व्ह बँकेची कोंडी केली जात असल्याच्या, रिझर्व्ह बँकेवर दबाव वाढवला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसकडून या मुद्द्याचं सध्या चांगलंच भांडवल केलं जात आहे. त्यातच वाढच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याच्या चर्चेने या वादात अधिकच तेल ओतले गेले. रिझर्व्ह बँकेचे व्हाईस गव्हर्नर वीरल आचार्य यांनीदेखील भाजप सरकारच्या काळात बँकांच्या स्वायत्ततेसंबंधी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून काँग्रेसने रान पेटवलेलं असतानाच अशाच वादासंदर्भात भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या एका पत्रामुळे काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. त्यामुळे ‘आम्हाला बोलता, पण तुम्ही तरी काय केलं होतंत?’ असा प्रश्न विचारण्याची संधी भाजपला मिळाल्याचं पाहायलं मिळत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पं. जवाहरलाल नेहरू यांचं एक पत्र भाजपच्या हाती लागलं असून त्या काळात सुद्धा केंद्र सरकार विरूद्ध रिझर्व्ह बँक यांच्यात वाद झाल्याचं या पत्रामधून समोर येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या वेळीही जवाहरलाल नेहरू यांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणांना विरोध करणारीच भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेसच्या सगळ्या विरोधातली हवाच निघून गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

काय झालं होतं १९५७ साली?

- Advertisement -

पं. जवाहरलाल नेहरू यांचं हे पत्र १९५७ सालचं आहे. रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर सर बेनेगल रामा राव आणि नेहरु यांच्याच धोरणावरून मतभेद झाल्याचं या पत्रावरून दिसून येत आहे. या पत्रानंतर रामा राव यांनी थेट गव्हर्नर पदाचा राजीनामाच दिला होता. हा वाद खरा सुरू झाला तो तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी आणि रामा राव यांच्यातल्या मतभेदामुळे. टी. टी. यांनी अर्थसंकल्पात रिझर्व्ह बँक ही अर्थमंत्रालयाचाच भाग असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर साहजिकच रामा राव यांनी नाराजी व्यक्त केली.

का लिहिलं नेहरूंनी ‘ते’ पत्र?

हे प्रकरण जेव्हा पंडित नेहरूंकडे गेले, तेव्हा त्यांनीही टी.टी. यांचीच बाजू घेत रामा राव यांना सुनावले होते. ‘आरबीआयने सरकारला मार्गदर्शन करण्याबरोबरच सरकारसोबतच मार्गक्रमण करायला हवं. तुम्हाला जर हे करणं कठीण होत असेल, तर तुम्ही राजीनामा देऊ शकता’, अशा आशयाचा उल्लेख या पत्रामध्ये नेहरूंनी केला होता. यानंतर काही दिवसांतच राव यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

आता काँग्रेसची भूमिका काय असेल?

- Advertisement -

दरम्यान, भाजपच्या हाती नेहरूंचं हे पत्र लागल्यामुळे काँग्रेसची मात्र चांगलीच गोची झाली आहे. आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर बंधनं आणल्याची टीका त्यांच्याकडून केली जात होती. मात्र, नेहरूंनीच १९५७ साली घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या विरोधातली हवाच निघून गेली आहे.

- Advertisement -