समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील प्रचारसभेत भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्यावर अश्लील शब्दात टीका केली. त्यामुळे आझम खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर जया प्रदा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आझम खान यांचे वक्तव्य माझ्यासाठी अजिबात नविन नाही. २००९ साली मी समाजवादी पार्टीची उमेदवार होती. त्यावेळीदेखील त्यांनी माझ्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. परंतु, त्यावेळी मला कुणी पाठिंबा दिला नव्हता. मी एक महिला आहे आजम खान जे बोलू शकतात, ते मी बोलू शकत नाही. मी त्यांचे काय वाईट केलं आहे ते मला माहित नाही. परंतु, ते वारंवार माझ्यावर अशा शब्दांमध्ये टीका करत असतात’, असे जया प्रदा म्हणाल्या आहेत.
‘मी रामपूर सोडणार नाही’
आझम खान यांच्या वादग्रस्त विधानाला उत्तर देताना जया प्रदा म्हणाल्या की, ‘आझम खान यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये. कारण हा माणूस जिंकला तर लोकशाहीचे काय होईल? समाजामध्ये महिलांना किंमत राहणार नाही. त्यामुळे आम्ही महिलांनी कुठे जायचे? मी मेव्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का? तुम्हाला जर वाटत असेल मी रामपूर सोडून निघून जाईल. पण मी रामपूर सोडणार नाही.’
Jaya Prada on Azam Khan’s remark:It isn’t new for me,you might remember that I was a candidate from his party in’09 when no one supported me after he made comments against me.I’m a woman&I can’t even repeat what he said.I don’t know what I did to him that he is saying such things pic.twitter.com/KEKzFvlQbF
— ANI UP (@ANINewsUP) April 15, 2019