घरदेश-विदेशJEE Main Result April 2019: कधी लागणार निकाल जाणून घ्या

JEE Main Result April 2019: कधी लागणार निकाल जाणून घ्या

Subscribe

जेईई मेन ही परीक्षा वर्षातून २ वेळा आयोजित केली जाते. २०१९ या वर्षातील पहिल परीक्षा जानेवारीमध्ये तर दुसरी परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आली होती. तसेच आता एप्रिलमध्ये दिलेल्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी वाट बघत आहेत. तर हा निकाल नेमका कधी लागू शकतो हे जाणून घ्या.

देशभरातील आयटीआय आणि इंजिनियरिंगच्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन ही परीक्षा द्यावी लागते. जेईई मेन २०१९ च्या परीक्षेचा निकाल लागण्यास वेळ लागणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकाऱ्यांना निकाला बद्दल विचाले असता ते म्हणाले की, जेईई मेन एप्रिल २०१९ च्या परीक्षेचा निकाल लागण्यास वेग लागणार आहे. तसेच एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहिर होणार होता, मात्र, निकालासाठी अजून थोड्या दिवस विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे. तसेच एप्रिल २०१९चा निकाल ३० एप्रिल नंतर जाहीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जानेवारीमध्ये वेळेच्या आधी जाहिर झालेल्या निकाला सारखे होणार नाही आहे. नेमकी तारीख ठरवून निकाल जाहिर केला जाणार आहे. हा निकाल जेईई मेन च्या https://jeemain.nic.in या वेबसाइटद्वारे जाहिर केला जाणार आहे.

एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त

ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेनची एप्रिलमध्ये परीक्षा दिली होती. त्या विद्यार्थ्यांना निकाल जाणून घेण्यासाठी वरिल वेबसाइट वर आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारीख टाकून लॉगइन करून आपला निकाल पाहू शकतात. तर जेईई मेन ही परीक्षा वर्षातून २ वेळा आयोजित केली जाते. या वर्षातील पहिली परीक्षा जानेवारीमध्ये तर दुसरी परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आली. एप्रिलमधील परीक्षा ७ ते १२ या तारखेला घेण्यात आली होती. एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या परिक्षेसाठी एकूण ११ लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. तसेच जानेवरीमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये ९,३५,७४१ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -