JEE Main Result : आज जाहीर होणार JEE Main चा निकाल; असा पाहा निकाल

jee main result 2020

कोरोनाच्या धर्तीवर घेण्यात आलेल्या जेईई मेन (JEE Main) परीक्षेचा आज निकाल लागणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जेईई मेनचा निकाल जाहीर करणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी जेईई मेन निकालाची माहिती एका ट्वीटद्वारे दिली. जेईई मेन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून निकाल लवकरच जाहीर केला जाईल, असं ट्विट त्यांनी केलं होतं.

जेईई मेन (JEE Main) निकाल २०२० असा तपासा

१. प्रथम NTA च्या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. येथे असलेल्या ‘JEE Main result 2020’ या लिंकवर क्लिक करा.
३. आता जेईई मेन लॉग इन तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
४. निकाल पाहण्यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरू शकता.
५. NTA जेईई मुख्य निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.
६. निकालाचे प्रिंटआउट घ्या.
७. एनटीए पर्सेंटाइल स्कोअर, ऑल इंडिया रँक आणि जेईई मेन कटऑफ याविषयीही माहिती निकालामध्ये असणार आहे.

जेईई मेन टॉपर २०२०, कटऑफ आणि कॉमन मेरिट यादी

जेईई निकाल घोषित करण्याबरोबर एनटीए जेईई मेन टॉपर यादी जाहीर करणार आहे. जेईई मेन कटऑफ आणि उमेदवारांची ऑल इंडिया रँकदेखील निकालासह जाहीर करणार आहे. जेईई मेन रँक यादी २०२० चे टॉप २,५०,००० उमेदवार JEE Advance २०२० साठी पात्र असतील.