घरदेश-विदेशजेट एअरवेज लवकरच बंद होण्याची शक्यता?

जेट एअरवेज लवकरच बंद होण्याची शक्यता?

Subscribe

बँकांनुसार, जेट एअरवेजची स्थिती नीट नाही. बँकेचं कर्ज चुकते करण्याइतके पैसेही सध्या कंपनीकडे नाहीत. तर सध्या कर्ज इतकं वाढलं आहे की, कोणत्याही बँका कर्ज देण्यासाठी तयार नाहीत.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून जेट एअरवेज कंपनी चर्चेत आहे. आता ही कंपनी बंद होणार अशी शक्यता निर्माण असल्याचा वावड्या उठत आहेत. कंपनीची वित्तीय स्थिती चांगली नसल्याची माहिती समोर आली आहे. बँकांनुसार, जेट एअरवेजची स्थिती नीट नाही. बँकेचं कर्ज चुकते करण्याइतके पैसेही सध्या कंपनीकडे नाहीत. तर सध्या कर्ज इतकं वाढलं आहे की, कोणत्याही बँका कर्ज देण्यासाठी तयार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त मंत्रालायनंही या संबंधी बँकांकडून तपशील मागवले आहेत. जेट एअरवेजची स्थिती किंगफिशर एअरलाईनसारखीच होणार नाही ना? याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

किंगफिशरपेक्षाही अधिक कर्ज

सध्या कर्जात डुबलेल्या जेट एअरवेजची स्थिती अजिबात चांगली नाही. कंपनीला आपल्या कर्माचारी, पायलटना देण्यासाठी पगार नाहीत. तर नुकतीच पगारामध्ये कपातही करण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार यातून कंपनी लवकरच बाहेर पडेल. मात्र बँकांच्या माहितीनुसार, जेट एअरवेज कर्जात बुडाली आहे. त्यावेळी किंगफिशरला देण्यात आलेल्या कर्जापेक्षाही जेट एअरवेजच्या कर्जाची रक्कम जास्त असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. ८१५० कोटी रुपयांच्या कर्जात सध्या ही कंपनी आहे.

- Advertisement -

वाचा – जेट एअरवेजच्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार कमी 

कंपनीवर ही स्थिती का आली?

हवाई इंधनात सततची महागाई आणि इंडिगोद्वारे मार्केटमध्ये जास्त शेअर घेतल्यामुळं जेट एअरवेजचं संकट वाढलं आहे. २०१७ मध्ये कंपनीचा नफा चांगला होता, मात्र २०१८ मध्ये कंपनी ७६७ कोटी रुपयांचा तोटा सहन करत आहे. पहिल्या तिमाहीत हा आकडा एक हजार कोटी पार करण्याची शक्यता आहे. तर कंपनीकडे सध्या फक्त दोन महिने पुरतील इतकेच पैसे शिल्लक आहेत. कर्ज चुकवण्याइतके पैसे नसून सध्या पगार कपात करून ५०० कोटीच्या आसपास पैसे कंपनी जमवत असल्याचं म्हटलं जात आहे. तर, सध्या बँकेचं कर्ज हे फेडण्यासाठी प्रतिमाह १५०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. कंपनीचे मालक विजय गोयल यांनी या सगळ्या अफवा असल्याचं नमूद केलं आहे. तर यासंदर्भात एक स्पष्टीकरणदेखील कंपनीकडून निर्गमित करण्यात आलं आहे. दरम्यान जेट एअरवेजविरुद्ध सतत येणाऱ्या बातम्यांमुळं शेअरमध्ये ६३ टक्के उतार आला आहे. जर कंपनीची वित्तीय स्थिती सुधारली नाही तर, अजून उतार येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काय आहे कंपनीचं म्हणणं?

कंपनीच्या म्हणण्यानुसार या सगळ्या बातम्या अतिशय बिनबुडाच्या आहेत. कंपनीची स्थिती चांगली असून कॉस्टकटिंग ही फक्त एक प्रक्रिया असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान आता जेट एअरवेज नॉन-मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करणार नसल्याचं समोर आलं आहे. सोमवारी देण्यात आलेल्या स्पष्टीकरणामध्ये हे सांगण्यात आलं आहे. तर, एअरलाईननं जुलै महिन्याचा पगारदेखील शुक्रवारीच क्रेडीट केला आहे. मात्र टॉप मॅनेजमेंटचा पगार कपात करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -