घरदेश-विदेशजेट एअरवेजवर आर्थिक संकट, कमी झाले शेअर्सचे भाव

जेट एअरवेजवर आर्थिक संकट, कमी झाले शेअर्सचे भाव

Subscribe

देशातील मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक जेट एअरवेज सध्या आर्थिक अडचणीत आहे. मागील काही दिवसांमध्ये त्यांच्या शेअर्समध्ये घट झाली आहे.

देशातील सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ होतांना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून जेट एअवेज कपंनीच्या विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात येत आहे. कपंनीला आर्थिक चणचण असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानधन थकवण्यात आले. या समस्यांमुळे मागील काही दिवस जेट एअरवेज चर्चेचा विषय बनले होते. आता जेट एअरवजेच्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जेटएअरवेजच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून मोठी घसरण आली आहे. सध्या जेटएअरवेजच्या शेअर्सचा भाव हा २२५.९० रुपयांंवर आला आहे. यामुळे आता या कंपनीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जेटएअरवेजला सुरु ठेवण्यासाठी पैशाची जमाजमव सुरु आहे.

- Advertisement -

जेट लवकरच प्रवाशांना पूर्वी प्रमाणे सेवा देणार 

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही अशाच प्रकारची पैशांची जमवाजमव केली होती. या संदर्भात कंपनीच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार,”जेट एअवेजने विमानांचे भाडे न चुकवल्यामुळे विमानांना उभे ठेवण्यात आले आहे. प्रिपेड तिकिटाच्या विक्रीनंतर कंपनीने ३.५ कोटी डॉलर्स जमवले आहेत. सध्या कंपनी आर्थिक संकटांमध्ये असल्यामुळे पैशाची चणचण भासत आहे. मात्र लवकरच जेटएअरवेज यावर पर्याय काढून प्रवाशांना पून्हा तशीच सुविधा देणार आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -