जेट एअरवेजचं फुकट जेवण बंद होणार!

जेट एअरवेजकडून विमानांमध्ये दिलं जाणारं फ्री मिल अर्थात मोफत जेवण बंद केलं जाणार आहे. कमी तिकीटदर असणाऱ्या विमानांमधलं जेवण बंद केलं जाणार आहे.

Mumbai
jet airways to stop free meal
जेट एअरवेजकडून विमानात दिलं जाणारं फ्री मिल होणार बंद

विमानासाठी लागणाऱ्या इंधनाची दरवाढ, देशांतर्गत बाजारपेठेत वाढत चाललेली स्पर्धा आणि फेडावं लागणारं मोठं कर्ज या पार्श्वभूमीवर आता देशांतर्गत प्रवासी वाहतूक देणाऱ्या जेट एअरवेज विमान कंपनीने कॉस्ट कटिंग करायला सुरुवात केली आहे. मात्र, जेट एअरवेजमधलं कॉस्ट कटिंग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नसून कंपनीकडून प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांच्या बाबतीत आहे. त्यामुळे जेटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कंपनीचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत जेट एअरवेजच्या विमानांमध्ये सर्व श्रेणींसाठी (बिझनेस क्लास, इकॉनॉमी क्लास) प्रवाशांना मोफत जेवण दिलं जात होतं. मात्र, आता कंपनीने हे जेवण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जेट एअरवेजची काटकसर!

गेल्या काही महिन्यांपासून जेट एअरवेज विमान कंपनीला मोठ्या प्रमाणावर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. त्यातच विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किंमती गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्या असल्यामुळे काटकसर करण्याशिवाय जेट एअरवेजसमोर पर्याय उरलेला नाही. या पार्श्वभूमीवर जेट एअरवेजने विमानात पुरवलं जाणारं जेवण बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ७ जानेवारीपासून हा निर्णय अंमलात येणार आहे.

तिकीट दर कमी असणाऱ्या विमानांबाबत निर्णय

दरम्यान, सध्या फक्त कमी तिकीट दर असणाऱ्या विमानांमधलं जेवणच बंद करणार असल्याचं जेटने स्पष्ट केलं आहे. वास्तविक याआधीच जेट एअरवेजनं सर्वात कमी दर असणाऱ्या २ फ्लाईटमधलं जेवण बंद केलं आहे. आता आणखी २ फ्लाईटमधलं जेवण बंद करण्यात येणार आहे. येत्या ७ जानेवारीमधून हे जेवण बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, इकोनॉमी क्लासमधलंच जेवण बंद करण्यात येणार असून बिझनेस क्लास आणि इंटरनॅशनल फ्लाईट्समधली सेवा तशीच सुरु राहणार असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


हेही वाचा – टाटा करणार जेट एअरवेजची खरेदी

इतर कंपन्यांसमोरही आर्थिक संकट!

दरम्यान गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या जेट एअरवेजला सध्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि कंपनी चालवण्यासाठीच्या खर्चात झालेली वाढ या पार्श्वभूमीवर आर्थिक समस्या भेडसावू लागली आहे. त्याचप्रमाणे देशातल्या इतर विमान कंपन्या देखील अशाच प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here